why bollywood actor akshay kumar not participate in bhool bhulaiyaa explained sakal
Premier

'भूल भुलैया'च्या सिक्वेलमधून अक्षय कुमारला वगळले कारण...

भूल भुलैया हा बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

सकाळ वृत्तसेवा

भूल भुलैया हा बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट प्रियदर्शनने दिग्दर्शित केला होता.

'भूल भुलैया'च्या सिक्वेलची घोषणा झाली त्या वेळी अक्षय कुमार, अनीस बज्मीमुळे 'भूल भुलैया २'चा भाग बनणार नसल्याची बातमी समोर आली होती. या चित्रपटात त्याची जागा कार्तिकने घेतली. आता ‘भूल भुलैया-३’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. अक्षय कुमारला चित्रपटातून काढून टाकण्यात त्यांचा हात नसल्याचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

नो एंट्री आणि वेलकम सारखे सुपरहिट चित्रपट देणारा अनीस बज्मी त्याच्या आगामी 'भूल भुलैया-३' या चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत होता. त्यांचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शकाने कार्तिक आर्यनला सिक्वेलमध्ये कास्ट करण्याचे कारण सांगितले.

तो म्हणाला, "जेव्हा मी कार्तिकचा 'प्यार का पंचनामा' पाहिला, तेव्हा मी त्याचे कौतुक केले. त्यानंतर मी लंडनमध्ये शूटिंग करत होतो. मला तो नेहमी चांगला दिसत होता. त्यामुळे त्याचे नाव मी सुचविले. जेव्हा दिग्दर्शक अनीस बज्मी यांना विचारण्यात आले की, निर्मात्याने भूल भुलैया २ साठी कार्तिकचे नाव सुचवले आहे का, तेव्हा दिग्दर्शकाने ''हो'' असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT