Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding sakal
Premier

Sonakshi- Zaheer Wedding Date: सोनाक्षी- झहीरने २३ जून रोजीच का केलं लग्न? त्यामागेही आहे खास कारण, फोटोमधून झाला खुलासा

Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांनी २३ जून रोजी लग्नगाठ बांधली.

Payal Naik

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर एकच चर्चा होती ती म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांच्या लग्नाची. ते दोघेही कोणत्या पद्धतीने लग्न करणार, लग्नात कोणते कपडे घालणार इथपासून लग्नातील पाहुण्यापर्यंत सगळंच जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता अखेर सोनाक्षी आणि झहीर यांनी २३ जून २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यांनी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन आयोजित केलं होतं. मात्र त्यांनी लग्नासाठी २३ जून हीच तारीख का निवडली हे तुम्हाला ठाऊक आहे का?

काय आहे कारण?

सोनाक्षीच्या लग्नाला सलमान, तब्बू, रेखा, काजोल, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यांचा रिसेप्शन लूकदेखील सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. लाल साडी, कुंकू, चुडा यात सोनाक्षी खूप सुंदर दिसत होती. त्यांनी आपल्या रिसेप्शनला डान्सदेखील केला. मात्र त्यांनी २३ जून रोजी लग्न कारण्यामागेही खास कारण आहे. त्यांनी याचं कारण त्यांच्या फोटोमध्ये सांगितलं आहे. २३ जून रोजी त्यांनी एकमेकांना होकार दिला होता. २३ जून रोजीच त्यांचं नातं सुरू झालं.

सोनाक्षी आणि झहीरने आपले फोटो शेअर करत लिहिलं, 'आजपासून ७ वर्ष आधी आजच्याच दिवशी २३ जून २०१७ रोजी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम पाहिलं. आणि ते प्रेम कायम ठेवायचा निर्णय घेतला. आज त्याचं प्रेमाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे. आज आमची दोन्ही कुटुंब आणि दोन्ही देवांच्या आशीर्वादाने आम्ही आता पती पत्नी आहोत.' सोनाक्षी आणि झहीर यांची पहिली भेट ही सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये झाली होती. सात वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी २३ जूनला लग्नगाठ बांधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT