Ayodhya Ram Mandir Pune Connection
Ayodhya Ram Mandir Pune Connection  esakal
प्रीमियम ग्लोबल

रामलल्लाच्या मूर्तीसाठी काळ्या पाषाणाचीच निवड का?

Shraddha Kolekar

पुणे : ३०० कोटी वर्ष जुन्या काळ्या पाषाणात (गॅब्रो) घडविण्यात आलेल्या अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या घडणीत पुण्याचा मोठा वाटा आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ डॉ.नितीन करमळकर यांनी या मूर्तीसाठी कोणत्या प्रकारचा पाषाण असावा याबाबत सुचविले होते.

रामलल्ला यांची मूर्तीसाठीचा पाषाण ठरवीत असताना त्यात कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला गेला याबाबत डॉ.नितीन करमळकर (Dr.Nitin Karmalkar) यांच्याशी साधलेला संवाद..

(Latest Marathi news about Ayodhya Ram Mandir)

रामलल्लाच्या मूर्तीचा विषय तुमच्याकडे कधी आणि कसा आला?

साधारण सहा महिन्यांपूर्वी हा विषय आमच्याकडे आला होता. डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आणि गो.बं .देगलूरकर यांना मूर्तिशास्त्राप्रमाणे मूर्ती कशी असावी हे ठरविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

माझा भूगर्भशास्त्राचा अभ्यासक असल्याने त्याबाबत मला विचारणा झाली होती. या सगळ्यात माझी भूमिका इतकीच होती की भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून मूर्तीसाठी कोणत्या पाषाणाची निवड करावी यासाठी मी पर्याय सुचविले होते.

रामलल्लाच्या मूर्तीसाठी पाषाणाची निवड करताना काय विचार केला गेला?

अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या मूर्तीच्या पाषाणाची निवड करताना महत्वाचा विचार हा होता की, इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा भाविक रोज येणार तेव्हा मूर्तीला इतक्या भाविकांचे रोज स्पर्श होणार.

तसेच मूर्तीला लावण्यात येणारे लेप, दुग्धभिषेक अशा सर्वच गोष्टींमुळे मूर्तीची झीज होण्याची शक्यता असते त्यामुळेच मूर्तीचा पाषाण असा असायला हवा होता की मूर्तीची झीजही लवकर होणार नाही पण तिचे रूप अधिक देखणे दिसेल अशा दोन्ही गोष्टी विचारात घेण्यात आल्या होत्या.

यात एक पर्याय होता ज्यात क्वार्टझाइट, ग्रॅनाईट, सोप स्टोन असे काही पर्याय होते. पण quartzite हा अत्यंत अत्यंत टणक पाषाण होता तर सोप स्टोन म्हणजे ज्याला साबणासारखा कोणताही आकार देणे शक्य असते, पण तो टिकाऊ नसतो. त्यामुळे साधारण चार पर्यायांचा विचार केल्यानंतर आम्ही एक पाषाण निश्चित केला.

गॅब्रो (काळा पाषाण) या पाषाणाची निवड करण्यामागे नेमके कारण काय?

पाषाणाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वालुकामय पाषाण, रूपांतरित आणि अग्निजन्य पाषाण. आम्ही मूर्तीसाठी गॅब्रो नावाचा पाषाण सुचवला. हा पाषाण अग्निजन्य प्रकारात येतो. अग्निजन्य प्रकारातही दोन प्रकार येतात.

ज्वालामुखीतून शिलारस बाहेर आला की जो जमिनीवर थंड होतो तो बेसाल्ट (महाराष्ट्रात मिळणार कला पाषाण) असतो. आणि जो जमिनीखानी थंड होतो तो पाषाण म्हणजे गॅब्रो (काळा पाषाण) . जमिनीखाली थंड झाल्याने तो अधिक चांगल्या पद्धतीने तयार झालेला असतो.

सर्व प्रकारच्या भूगर्भीय प्रक्रियेतून तावून सुलाखून निघालेले हा पाषाण आहे. हा पाषाण कर्नाटक भागात खासकरून मैसूर येथे आढळून येतो.

पृथ्वीवरील सर्वात जुन्या पाषाणांपैकी असणाऱ्या पाषाणामध्ये गॅब्रोचे नाव येते. हा पाषाण साधारण २५० ते ३०० कोटी वर्ष जुना पाषाण आहे. मुख्य म्हणजे हा टणक असूनही याला एक प्रकारची चमक असते.

मूर्तिशास्त्रानुसार घडविली जाणारी मूर्ती म्हणजे नेमके काय?

मुर्त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. बैठी मूर्ती, उभी मूर्ती, सिंहासनावर आरूढ झालेली मूर्ती किंवा रथातील मूर्ती असे वेगवेगळे प्रकार असतात.

त्यासोबतच मूर्तीची मुद्रा कशी असावी, आयुधं कोणती असावी, रूप कसे असावे त्याचा इतिहास काय सांगतो अशा सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला असतो. मूर्तिशास्त्राचे अभ्यासकांचा वर्षानुवर्षे या इतिहासाचा, या विषयाचा अभ्यास असतो.

रामल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये काय आहेत?

प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवीत असताना मुळातच ते पाच ते सहा वर्षांचे रामलल्ला असल्याने मूर्तीची सर्व वैशिष्ट्ये त्याच प्रकारची होती. पूर्वीच्या काळी मुंज सुद्धा आठव्या वर्षी होत असे आणि त्यानंतर तो पुत्र शिक्षणासाठी गुरुकडे जात असे.

त्यामुळेच पाच ते सहा वर्षाचा रामलल्ला कोदंडधारी असावा की नसावा म्हणजेच रामलल्लाच्या हातात धनुष्यबाण द्यायचा की नाही. पण जर नाही दिला तर ती मूर्ती कृष्णाजवळ जाणारी वाटू शकते. म्हणून मग धनुष्याबाण दिला गेला तरी शिकारीसाठी असणारा भाता दाखविण्यात आला नाही.

ही बालमुद्रा असल्याने गोबरे गाल, डोळ्यातली निरागसता, हसरा चेहरा, सोडलेले केस असे ठरविण्यात आले. त्यातच ही मूर्ती मुकुटधारी असावी की नाही अशा अनेक प्रकारच्या चर्चा करून मूर्तीची प्रतिमा तयार करण्यात आली आणि त्यानंतर मूर्ती घडविण्यात आली.

----------

(Savitribai Phule Pune University and Ayodhya Ram Mandir Connection)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT