robotic kitchen
robotic kitchen esakal
प्रीमियम ग्लोबल

Robotic Kitchen :२०२४ मध्ये तुम्ही रोबोटिक किचन मधील जेवणाचा आस्वाद घेऊ शकणार?

Shraddha Kolekar

मुंबई: संपूर्णपणे एखाद्या रोबोने बनविलेले जेवण जर तुम्हाला चाखायला मिळाले तर..? २०२४ हे वर्ष ही पर्वणी घेऊन येण्याची शक्यता आहे. रोबोने बनविलेले जेवण, रोबोने वाढलेले जेवण आणि फूड डिलिव्हरी देखील ड्रोनने केलेली...

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) क्षेत्रात २०२४ या वर्षात अनेक उत्पादने येऊ घातलेली असून त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडण्याची शक्यता आहे.

'रोबोटिक किचन' (Robotic kitchen) ही संकल्पना अन्य देशात तशी फारशी नवी नसली तरी भारतात मात्र अजून रोबोने बनविलेले जेवण जेवण्याची सवय लोकांना झालेली नाही. परंतु चॅट जीपीटी (chat GPT) नंतर आता गुगलचे जेमिनी (google Gemini) हे एआय मॉडेल बाजारात आल्यानंतर आता अनेक कंपन्यांनी त्यांचे एआय मॉडेल बाजारात लाँच करण्यात सुरुवात केली आहे.

२०२४ मध्ये 'क्लाउड किचन' संकल्पना जोर धरणार

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनानंतर जगात 'क्लाउड किचन' (cloud kitchen) ही संकल्पना जोर धरत आहेत. अनेक घरगुती किचन किंवा छोटे व्यावसायिक थेट फूड डिलिव्हरी कंपन्यांशी टायअप करून फूड डिलिव्हर करतील. भारतातही २०२४ या वर्षात अशा प्रकारचा ट्रेंड सुरु होण्याची शक्यता आहे.

अन्ननिर्मितीमध्ये रोबोटिक मॅकॅनिझमचा वापर होणार

सर्व क्षेत्रात एआय चा वापर होत असून अन्ननिर्मितीमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणात काम करणार आहे.

लहान मोठे हॉटेल व्यावसायिक आपल्या किचनमध्ये सहायक म्हणून, शेफ म्हणून रोबोटिक्सचा वापर करू शकतील.

यूके मधील एका कंपनीने 'ऑटोमेटेड किचन' (automated kitchen) चे मॉडेल तयार केले असून या मॉडेलच्या माध्यमातून पदार्थ बनवणे, नवीन पदार्थ तयार करणे आणि किचन स्वच्छ देखील करणे आदी सर्व कामे या माध्यमातून होतात.

फूड डिलिव्हरी सुद्धा 'एआय'च्या माध्यमातून होणार?

येत्या वर्षात फूड डिलिव्हरी देखील आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होणार असल्याची शक्यता आहे. उबर या कंपनीला ड्रोन डिलिव्हरी बाबत काही देशामध्ये परवानगी देखील मिळाली आहे. तर 'सेल्फ ड्रायव्हिंग डिलिव्हरी व्हेईकल' बाबतही काही कंपन्यांचे काम सुरु आहे.

भारत अन्न उत्पादन आणि प्रक्रियेतील दुसरा सर्वात मोठा देश आहे.

भारतातील फूड प्रोसेसिंग मार्केट २०२० मध्ये २६३ बिलियन डॉलरचा होता तो २०२५ पर्यंत ४७० बिलियन डॉलरचा होणार असल्याचे https://indiafood.icfa.org.in या संस्थेने म्हंटले आहे.

भारतीय अन्न आणि किराणा बाजार हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे, ज्यात किरकोळ विक्रीचा ७० टक्के वाटा आहे. भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाचा देशाच्या एकूण अन्न बाजारपेठेतील ३२% वाटा आहे, जो भारतातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे.

उत्पादन, निर्यात आणि अपेक्षित वाढीच्या बाबतीत देखील हा पाचव्या क्रमांकावर आहे. भारताच्या एकूण निर्यातीच्या १३% आणि एकूण औद्योगिक गुंतवणुकीच्या ६%. वाटा अन्न उत्पादन आणि प्रक्रियेचा आहे. तर भारतात सर्वाधिक म्हणजे १७ टक्के फूड प्रोसेस हे महाराष्ट्रात होते.

भारतात ५० टक्के रॉ फूड (Row Food) खाल्ले जाते

जगातील काही प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात रॉ फूड (कच्चे पदार्थ ) खाण्याचे प्रमाण हे ५० टक्के आहे. सेमी प्रोसेस फूड खाण्याचे प्रमाण हे १९ टक्के आहे तर पूर्णपणे प्रक्रिया केलेले म्हणजेच प्रोसेस फूड खाण्याचे प्रमाण हे ३१ टक्के आहे.

ब्राझीलमध्ये देखील भारताप्रमाणे रॉ फूड खाण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. जर्मनी या देशात रॉ फूड खाण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे तर 'यूएस' मध्ये देखील रॉ फूड खाण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे.

शाकाहारी पर्यायांसाठी भारत महत्वाचा देश

जगाच्या तुलनेत भारताकडे शाकाहारी पदार्थांचे (veg food) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच जगातील अनेक देशांमध्ये पोषणमूल्य असलेल्या खाद्यपदार्थांना अधिक मागणी आहे.

यातच २०२३ हे वर्ष जागतिक भरडधान्य वर्ष (international millet year) म्हणून जाहीर झाल्यानंतर भारतीय अन्नपदार्थांचे जागतिक स्तरावर ब्रॅंडिंग झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, भारताकडे असलेला शाकाहारी पर्याय, भारताचे झालेले ब्रॅंडिंग या सगळ्याच गोष्टींमुळे भारतीय 'फूड मार्केट' ला अच्छे दिन येणार असल्याची शक्यता आहे.

------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT