pear body shape clothes
pear body shape clothes esakal
साप्ताहिक

पेअर शेप बॉडीसाठी वापरा असे कपडे; या रंगाचे कपडे घातल्याने दिसाल बारीक..!

साप्ताहिक टीम

सोनिया उपासनी

प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असतो. कुठलीही फॅशन करताना आपली शरीरयष्टी लक्षात घेऊन जर सर्व गोष्टींचा वापर केला, तर कुठल्याही लुकमध्ये उठून दिसता येते.

आपल्या शरीरयष्टीला न शोभणारी, चुकीची फॅशन फॉलो केली तर ते चांगले दिसत नाही. फॅशन वेस्टर्न असो वा ट्रॅडिशनल, कॅज्युअल असो वा फॉर्मल; आपल्या शरीराचे बारकावे लक्षात घेऊन कपड्यांचा, ज्वेलरीचा आणि इतर ॲक्सेसरींचा वापर केला, तर आपले बॉडी फ्लॉज् व्यवस्थितरित्या झाकता येतात.

मागील लेखात आपण कमी उंची असणाऱ्यांनी कशाप्रकारे स्वतःला इन ट्रेंड ठेवायचे, हे पाहिले. आता ज्यांची अपर बॉडी सडपातळ आणि लोवर बॉडी हेवी असते त्यांनी कशा प्रकारची फॅशन करायची, हे पाहू. अशा प्रकारच्या शरीरयष्टीला ‘पेअर शेप’ बांधाही म्हणतात.

पेअर या फळाच्या आकारावरून या बांध्याला ‘पेअर शेप’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पेअर फळाचा आकार वरून लहान आणि खालून मोठा असतो.

काही जणांच्या शरीरयष्टी अगदी तशीच असते. खांदा, कंबर हा भाग बारीक आणि कंबरेपासून खालील भाग मोठा असतो.

मांड्या मोठ्या असतात आणि हिप सर्कमफरन्सही मोठा असतो. पेअर शेप बॉडी असणाऱ्या महिलांनी कोणत्या कपड्यांची निवड करायची हे समजून घेऊयात.

जर कंबर, हिप राऊंड किंवा मांड्या फारच जाड असतील तर गडद रंगाचे बॉटम्स निवडावेत. गडद रंग परिधान केल्याने खालचा पिअर बॉडी शेप व्यवस्थित मापात दिसण्यास मदत होईल. जर अप्पर बॉडीदेखील लोअर बॉडीप्रमाणेच हेवी असेल, तरीदेखील गडद रंगांचेच कपडे परिधान करावेत.

शेपमध्ये दिसण्यासाठी शक्यतो कायम गडद रंगांचेच कपडे घालण्याचा पर्याय निवडावा. गडद रंगाचे कपडे परिधान केल्याने वजन कमी दिसते. पिअर शेप बॉडी असलेल्यांनी जास्त व्हॉल्युम असलेल्या फॅब्रिकऐवजी फिटिंग म्हणजेच अंगाला फिट बसणाऱ्या फॅब्रिकची निवड करावी.

नायलॉन, क्रेप, रेयॉन यांसारख्या फॅब्रिकपासून तयार झालेले कपडे घालता येतील. याउलट बटर कॉटन, पेपर सिल्‍क, ऑर्गेंझा यांसारख्या फॅब्रिकचे कपडे घालणे शक्यतो टाळावे, पफी स्‍लीव्ह्स घालण्यावर जास्त भर द्यावा.

वजन जास्त असेल तर क्रॉप टॉप, फिटिंग कुर्ती असे कपड्यांचे प्रकार निवडावेत. त्याचप्रमाणे फिगरला बॅलन्स करण्यासाठी खांद्यांना हायलाईट करावे. त्यासाठी स्कार्फ, शॉल किंवा रंगीबेरंगी नेकपीसचा वापर करावा.

फ्लेअर्ड ड्रेस वापरले तर बांधा उठून दिसेल. अपर बॉडी निमुळती असल्यास शोल्डर किंवा ट्युब ड्रेस घालण्यास काहीच हरकत नाही. पिअर बॉडी शेपबरोबरच जर उंचीही कमी असेल, तरीदेखील तुम्ही लांब कपडे निवडू शकता.

गाऊन या प्रकाराची निवड करताना तो फार पायघोळ नाही ना याची काळजी घ्या, पायघोळ गाऊनमुळे उंची कमी दिसू शकते. ज्वेलरीची निवडताना तुम्ही गळ्यालगत असलेल्या आणि फार लांब नसलेल्या ज्वेलरीची निवड करावी.

ह्या सर्व बाबी नीट लक्षात घेतल्या, तर उत्तमप्रकारे फॅशनेबल दिसता येईल.

--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT