पुणे महानगर
पुणे महानगर Esakal
Home Loan

Pune Metrocity- नवी प्राॅपर्टी घेण्यासाठी सध्याचा काळ सर्वोत्तम

नरेंद्र जोशी

भारतातील सर्वाधिक वेगाने वाढ होणाऱ्या शहरांमध्ये पुणे महानगर आहे. पीएमआरडीएच्या व्याप्ती वरून आपणास ते लक्षात येते. पीएमआरडीए ह देशातील सर्वांत मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे महानगर विकास प्राधीकरण आहे. मेट्रो, रिंगरोड, Metro Ring Road यासारख्या प्रकल्पांनी विकसित महानगराकडे जाण्याच्या पुणे महानगराच्या प्रवासाला गती दिली आहे. सध्या बांधकाम Construction सुरू असलेला पुणे मेट्रो प्रकल्प हा केवळ रिअल इस्टेटच्या वाढीसाठीचा एक मानांकन ठरणार नाही. मात्र शहराच्या राहणीमानाचा निर्देशांक आणि रहाणीमानाची प्रत वाढवेल.  Pune Megacity Real Estate Hot Destination

या सोबतच पुण्याला तीन विमानतळांचे Airports वरदान लाभलेले आहे. ज्यातील एक आत्ताच अस्तित्वात आहे आणि उर्वरित दोन अनुक्रमे नवी मुंबई आणि पुरंदर येथे उभारले जाते आहे. यामुळे पुणे महानगरातील उद्योग- व्यवसायांना मोठी चालना मिळेल त्यासोबत शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व ऑटो क्षेत्रातील Auto Sector मुबलक उद्योग व रोजगारा सोबतच स्वच्छ पाणी, मोकळी हवा, बारमाही सुसह्य वातावरण ही नॅचरल युनिक गोष्टी आहेतच.. 

गुंतवणुकीसाठी रियल इस्टेट Real Estate हे सर्वांत सुरक्षित क्षेत्र असल्याचे वारंवार सिद्ध झालेले असून येत्या काळात पुण्यात राहणाऱ्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. खालील काही विकसित व विकसनशील उपनगरांचा पुणे शहरातील हॉट डेस्टिनेशन्स म्हणून उल्लेख करता येईल. 

पूर्व : विमाननगर, न्यू कल्याणीनगर, मुंढवा, हडपसर 

पश्चिम पुणे : बावधन, भूगाव, बाणेर, बालेवाडी हिंजवडी, वाकड, रावेत, गहुंजे. मामूर्डी

दक्षिण पुणे : एनआयबीएम रोड, उंड्री, पिसोळी 

उत्तर पुणे – चर्होली, आळंदी, चोवासावाडी. चिखली

हे देखिल वाचा-

जे खरेदीदार आरामदायी घराच्या शोधात आहेत, ज्यांना बजेटसाठीच्या मर्यादा नाही, किंवा ज्यांना आरामदायी घरांत गुंतवणुक करायची आहे, अशांसाठी पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये कोरेगाव पार्क, कोथरूड, प्रभात रोड, कर्वे नगर, एरंडवणे, सहकार नगर अशा विविध भागांमध्ये पुनर्विकास प्रकल्प मोठ्या संख्येने उभे राहत असून तिथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात रिअल इस्टेटच्या निवासी क्षेत्रात मोठी मागणी आणि त्याअनुरूप वाढ दिसून आली. खूप लोकांना लक्षात आले की, त्यांना जर कोरोना महामारीच्या वा अशा अन्य कठीण काळामध्ये घरातच थांबणे अपरिहार्य आहे, आणि घरातून चालणाऱ्या ऑफिस तसेच शाळेसाठी अधिक व्यवस्थित जागेची गरज भासणार आहे. 

हे देखिल वाचा-

आत्ताचा काळ हा पुणे महानगरात नवीन प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी उत्तम काळ आहे. निवासी क्षेत्रातील हालचाल व ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. याला अनेक घटक कारणीभूत आहेत.

कोरोना आपदा काळामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना मोठ्या व सुविधासंपन्न घराचे महत्त्व पटले. जे लोक आधी भाड्याच्या घरात राहत होते ते आता सगळ्यात मोठे संभाव्य घरखरेदीदार आहेत. येत्या काही वर्षात पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट भरभराटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

PM Modi's Swearing-In Ceremony: एकदम थाटात! शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा पहिला व्हिडिओ समोर

Exit Poll Plea: 'एक्झिट पोल'वाले येणार गोत्यात? 'या' प्रकरणात चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

French Open 2024 : इगा स्वैतेकची हॅट्ट्रिक; तिसऱ्यांदा कोरलं फ्रेंच ओपनवर नाव

Dhananjay Munde: बीडवासीयांनो, माझी हात जोडून विनंती... व्हिडिओ पोस्ट करत धनंजय मुंडे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT