wagholi.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' भागात जनता कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद 

निलेश कांकरिया

वाघोली (पुणे) : वाघोलीतील जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. मात्र, पुणे- नगर महामार्गावरील वाहतूक पूर्वी एवढीच सुरू होती. वाघोलीतील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत मध्ये बैठक घेण्यात आली. या मध्ये 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. याबाबत ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. सोशल मीडिया, फलक, स्पीकर वाहन याद्वारे आवाहन करण्यात आले. सहा दिवसाचा कर्फ्यू असल्याने नागरिकांनी शुक्रवारी खरेदी साठी गर्दी केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामधून रुग्णालये, दवाखाने, मेडिकल, डेअरी यांना वगळण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने नियमावली तयार केली होती. त्याबाबत सतत जनजागृती केली जात होती. यामुळे नोकरीला जाणाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. शुक्रवारीच नोकरीला जाणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. आम्हाला ड्युटी वर जात येईल की नाही याबाबत विचारणा सुरू होती. मात्र हा जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. सक्तीचा भाग नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. आज पहिल्या दिवशी मात्र कोठेही पोलीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांची गरज पडली नाही. सध्या वाघोलीतील रुग्णांची संख्या 989 झाली असून 733 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. 254 रुग्ण ऍक्टिव्ह असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
 

सक्ती करून होत नाही. मात्र, आज कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे समाधान  आहे. प्रत्येकाने काळजी घेतल्यास अशी वेळ येणार नाही.

- अनिल कुंभार, ग्रामविकास अधिकारी, वाघोली

 आठवडा भर बंद म्हणजे एक महिना आम्ही पुन्हा मागे जातो. आधीच आर्थिक कंबरडे मोडले आहे. केवळ लॉकडॉउन किंवा जनता करफू यावर उपाय नाही. जनता कर्फ्यूप्रमाणेच सर्व सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी. पथके स्थापन करून मास्क न वापरणाऱ्या व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या दुकानदार व ग्राहकांवर कारवाई करावी. यापुढे लॉकडाऊन अथवा जनता कर्फ्यू नको. हीच विनंती. अशी प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे लोकलने चर्चगेटला रवाना, सत्याचा मोर्चात सहभागी होणार

SCROLL FOR NEXT