पुणे

आठ किलोमीटरचा कडा उतरून 102 वर्षांच्या 'तरुणा'चे मतदान 

योगिराज प्रभुणे

पुणे : एकीकडे मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून पुणेकरांवर चोहोबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे मात्र मतदानाचे पवित्र कर्तव्य बजाविण्यासाठी आंदर मावळमधील (जि. पुणे) 102 वर्षांचा "तरुण' तब्बल आठ किलोमीटरचा कडा उतरून केंद्रावर आला व त्याने मतदान केले. घराच्या हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र असूनही अनेक जण मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. अशा मतदारांसाठी हा "तरुण' म्हणजे आदर्श उदाहरण आहे. पठारावरील काब्रा हे छोटेसे टुमदार गाव असून, तेथील खरात कुटुंबातील 102 वर्षांच्या लक्ष्मण रामा खरात यांची ही गोष्ट.
 
खरात हे मंगळवारी सकाळी सातला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. आठ किलोमीटर उंच असलेला पठाराचा कडा उतरण्यास त्यांनी सुरवात केली. कधी चालत, तर कधी बसत, असा अडीच तासांचा प्रवास करीत ते सकाळी दहाच्या सुमारास मतदान केंद्रावर पोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदान केल्याची खूण म्हणून बोटाला लावलेली शाई ते अभिमानाने दाखवत होते. तितक्‍याच उत्सुकतेने त्यांनी हे बोट "सकाळ'च्या प्रतिनिधीलाही दाखविले. खरात म्हणाले, "पहिलं मतदान कधी केलं ते नेमकं आठवत नाही. पण, पंडित नेहरूंना केलं होतं. त्यानंतर एकदाही मतदान चुकवलं नाही.'' 

मतदान हा आपला हक्क आहे. तो बजाविलाच पाहिजे, इतकं मला कळतं. त्यातून मला कायं मिळतं, असा विचार करायचा नाय. पण, मतदान केल्याचा आनंद मला मिळतो. म्हणूनच, कडा उतरून मतदान केंद्रावर येण्याचं बळ मिळतं. आता उन्हं उतरलं की परत कडा चढायला सुरवात करायची. दोन-तीन तासांनंतर घरी पोचेन, असे त्यांनी सांगितले. 

आता तरी रस्ता व्हावा 
इतकी वर्षं मतदान केल्यानंतरही घरापासून केंद्रापर्यंत येण्यासाठी रस्ता नाही. मी आयुष्यभर कडा उतरून मतदान केलं. मात्र, पुढची पिढी असं करेलच असं कसं म्हणावं. किमान आता तरी रस्ता व्हावा, या शब्दांत खरात यांनी काब्रा पठारावरील रस्त्याची गरज अधोरेखित केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT