Chandrakant Patil Esakal
पुणे

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : 11 पोलिस कर्मचारी निलंबित, प्रशासनाची मोठी कारवाई

कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं

सकाळ डिजिटल टीम

राज्यात वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं होतं . मात्र, हे राजकारण चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणी 11 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 8 पोलिस कर्मचारी आहेत. तर यामध्ये 3 पोलिस अधिकारी आहेत. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं होतं. कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी दौऱ्यावर असताना झालेल्या शाईफेक प्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिवांना अटक केली आहे. समता सैनिक दलाचे संघटक आरोपी मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना हे कृत्य केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अटक केली. या तिघांवरही भादवि कलम 307,353,294,500,501,120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT