PMPL-Bus
PMPL-Bus sakal
पुणे

बुधवार पासून पीएमपीच्या ११०० बस धावणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रवासी संख्या वाढू लागल्यामुळे पीएमपीच्या (PMP) बसची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुधवार (ता. ४) पासून सुमारे ११०० बस पुणे (pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) धावतील. (1100 PMP buses will run from tomorrow)

लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. सध्या दररोज सुमारे चार लाख २५ हजारांहून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे दररोज ७० ते ७५ लाख रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहेत.

विशेषतः उपनगरे आणि जिल्ह्यांतील बसच्या वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. याबाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे म्हणाले, ‘‘सध्या ९५० ते १००० बस दोन्ही शहरांत धावत आहेत. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता बस वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान १०० बस बुधवारपासून वाढविण्यात येतील. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून प्रवाशांना प्रवास करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्यानुसार चालक, वाहकांना सूचना दिल्या आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT