14 animals died due to heavy rain in Panshet valley pune sakal
पुणे

पानशेत खोऱ्यात अतिवृष्टीने १४ जनावरांचा मुत्यु

रायगड जिल्ह्यालगतच्या असलेल्या पानशेत धरण (ता.वेल्हे) खोऱ्यातील अति दुर्गम खाणु येथील डिगे वस्ती येथे अतिवृष्टीने गाई,बैल, म्हैस अशा १४ जनावरांचा बळी घेतला

मनोज कुंभार

वेल्हे,(पुणे) : रायगड जिल्ह्यालगतच्या असलेल्या पानशेत धरण (ता.वेल्हे) खोऱ्यातील अति दुर्गम खाणु येथील डिगे वस्ती येथे अतिवृष्टीने गाई,बैल, म्हैस अशा १४ जनावरांचा बळी घेतला आहे. वेल्हे तालुका पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ.भास्कर धुमाळ यांच्यासह पशुवैद्यकीय पथकाने आज रविवार (१७) घटनास्थळी दाखल झाले. अतिवृष्टीमुळे मुत झालेल्या जनावरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्गम भागात संपर्क होत नसल्याने तेथील नुकसानाची माहिती मिळत नाही.

त्यामुळे वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दुर्गम वाड्या, खेड्यात जाऊन माहिती घेण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. मुत जनावरांच्या शवविच्छेदनानंतर जनावरांच्या मुत्युचे नेमके कारण समजू शकेल असे वेल्हे तालुका पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.संजय कनुजे यांनी सांगितले. दोन आठवड्या पासून रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टी सुरू आहे. गोठ्यात चारा नसल्याने रानात जनावरे चारण्यासाठी सोडली जात आहेत. तीन दिवसां पुर्वी अतिवृष्टीमुळे ओढे नाल्यांना पुर आले होते. रात्र दिवंस धो धो पाऊस कोसळत होता. रानात सोडलेली जनावरे रात्री उशिरापर्यंत घरी आली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी रानात गेले.

त्यावेळी बबन झिमा कोकरे यांच्या चार गायी व दोन बैल, धोंडिबा झिमा कोकरे यांचा एक बैल, धोंडिबा रामा कोकरे यांची एक गाय, बबन रामचंद्र कोकरे यांची एक गाय, एक बैल, नथू धोंडू कोकरे यांची एक गाय, म्हाळू काळू कोकरे यांच्या दोन गायी, एक म्हैस अशा १४ जनावरांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. याबाबत टेकपोळेचे सरपंच संतोष कोकरे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर प्रशासनाचे डिगे वस्तीत धाव घेतली. पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील अति दुर्गम डोंगरकड्यावर खाणु,चांदर,डिगेवस्ती आदी वाड्या वस्त्या आहेत. सीमेवरहे गाव आहे.जोरदार थंड वादळी वाऱ्यासह धोधो पाऊस व पडत असल्याने जनावरांचा मृत्यू झाला असावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT