Motor Garage Fire sakal
पुणे

Motor Garage Fire : गॅरेजला लागलेल्या आगीत १७ चारचाकी वाहने जळून खाक

आई माता मंदिरा मागील गॅरेजला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत आलिशान मोटारींसह गॅरेज मधील जुन्या गाड्या जळून खाक झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी - आई माता मंदिरा मागील गॅरेजला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत आलिशान मोटारींसह गॅरेज मधील जुन्या गाड्या जळून खाक झाल्या. गॅरेज शेजारी मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि दोन वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खाञी करत चारही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पुर्ण विझवली.

आगीमध्ये गॅरेजमधील एकुण १७ चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे, आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जखमी वा जिवितहानी झाली नाही.

आग लागण्याचे कारण स्पष्ट होत नसल्याचे अग्निशमन अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले, आग विझविण्यासाठी चार बंब, दोन टँकरचा वापर करत कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे यांच्यासह सहकार्‍यांनी आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT