3arrested_54.jpg
3arrested_54.jpg 
पुणे

पुण्यात औषधी तेल विक्रीच्या नावाने 31 लाखांची फसवणूक; 2 नायजेरीयन तरुणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : औषधी तेल विक्री करण्याच्या बहाण्याने शहरातील एका रिअल इस्टेट एजंटला तब्बल 31 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोन नायजेरीयन नागरीकांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी लॅपटॉप, 11 मोबाईल डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. 

हेन्‍री चिकाडीबीआ झियोन (वय 35), इकीआयएसीन इफोंग (वय 25, दोघेही रा. पलावा सिटी, कल्याण शिल रोड, डोंबिवली पुर्व, ठाणे) मुळ रा. नायजेरीया) अशी अटक केलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील एका रिअल इस्टेट एजंटला झिओन व इफोंग यांनी ई-मेल व मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यांना गोल्डरेर कॉस्मेटीक या कंपनीमध्ये सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऍकेन्थस मॉलिश ऑईल हे औषधी तेल भारतात शेतकऱ्याकडून खरेदी करते. हे तेल भारतामध्ये एक लाख 42 हजार रुपये इतक्‍या स्वस्त दराने मिळते. हेच तेल आमची कंपनी दोन लाख 48 हजार रुपये इतक्‍या दराने विकत घेते. हे तेल खरेदी करण्यासाठी आमच्या कंपनीचे भारतातील प्रतिनिधी म्हणून मध्यस्थी करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी फिर्यादींना दिला. त्याद्वारे भरपुर नफा मिळेल. त्या नफ्यातील चाळीस टक्के रक्कम आपल्याला द्यावी, असे आरोपींनी त्यांना सांगितले. त्यानंतर हे तेल खरेदी करण्यासाठी वेगवेगळी व खोटी कारणे सांगून फिर्यादी यांना आरोपींनी दिलेल्या बँक खात्यामध्ये 31 लाख 42 हजार रुपये इतके रुपये वेळोवेळी भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यामध्ये तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष बर्गे, पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलिस कर्मचारी नितेश शेलार, अनुप पंडीत, ज्योती दिवाणे यांच्या पथकाने ठाणे येथे जाऊन सापळा रचून आरोपींना अटक केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT