road
road 
पुणे

ऐतिहासिक गड जोडणाऱ्या तीन रस्त्यासाठी 202 कोटीचा निधी

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : मुख्य रस्ता आणि ऐतिहासिक गडकोट आणि परिसरातील रस्ते रुंद व मजबूत करून पर्यटनाला चालना देणे हे राज्य सरकारचे धोरण असून, त्याअंतर्गत खडकवासला मतदार संघातील तीन रस्त्यासाठी 202 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदेड ते वेल्हे, खानापूर ते पानशेत व खेड शिवापूर ते सिंहगड पायथा हे तीन रस्ते असून याचे भूमिपूजन आज बुधवारी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होत आहे. यासाठी आमदार भीमराव तापकीर यांनी पाठपुरावा केला आहे. 

नांदेड फाटा- खडकवासला- गोऱ्हे- डोणजे- खानापूर- पाबे घाट मार्गे वेल्हे हा रस्ता असून, पुण्याहून थेट तोरणा किल्ला जोडला जाणार आहे. यासाठी 141 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील नांदेड ते खामगाव- मावळ पर्यंतचा भाग खडकवासला मतदार संघात येतो त्यासाठी 121 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या या रस्त्याची दुरवस्था आहे. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे फाट्या पर्यंत या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. नागरीकरण झपाट्याने झाले आहे. रस्त्यालगत अतिक्रमणे वाढली आहेत. दर शनिवारी रविवारी पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता झाल्यास नागरिक वाहन चालकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. यामध्ये सुरवातीचा रस्ता सव्वा किलोमीटर रस्ता चौपदरी व काही रस्ता काँक्रीट होणार आहे. येथे फुटपाथ देखील असणार आहे. 

याचबरोबर खानापूर ते पानशेत या रस्त्यासाठी सुमारे 44 कोटी तर खेड शिवापूर ते कोंढणपूर अवसरवाडी (सिंहगड पायथा) यासाठी 38 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे 202 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. अशी माहिती खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, मतदार संघाचे भाजपचे अध्यक्ष अरुण राजवाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले उपस्थित होते. 

"खडकवासला मतदार संघात रस्त्यासाठी सर्वाधिक जास्तीचा निधी आणला आहे. पावसाळा जास्त असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होते. एकदा रस्ता केला की, त्याला निधी पुन्हा मिळत नाही. हे रस्ते चांगल्या दर्जाचे व त्या रस्त्याचा 10 वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च ठेकेदारावर आहे. हायब्रीड अशा महाराष्ट्रातील हायब्रीड एँन्युइटी योजनेतून कामे होणार त्याती ही कामे आहेत. या रस्ता रुंदीमुळे या भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावणार आहे. जागा जमिनी व फ्लॅट च्या किंमती वाढणार आहेत.
- "भिमराव तापकीर, आमदार खडकवासला

हायब्रीड एँन्युइटी योजनेचे पाहिले काम या योजनेतून राज्यातील रस्त्यांच्या विकास केला जाणार आहे. त्यातील हे पहिली तीन कामे आहेत. यामध्ये, रस्ताचे काम दोन वर्षात पूर्ण करायचे असून काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला 60 टक्के रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित 40 टक्के रक्कम टप्प्याटप्याने दिली जाणार आहे. 10 वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती ठेकदारावर राहील. 

दृष्टिक्षेप
तिन्ही रस्त्यावर पूल मोऱ्यांची संख्या-  109 
सर्व रस्त्याची रुंदी 10 मीटर(33फूट)
पूल मोर्यांची रुंदी 12 मीटर (36 फूट)
काम पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षे
ठेकेदारांची देखभाल दुरुस्ती करण्याचा कालावधी 10 वर्षे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT