21-year-old man from Dhamani died after difficulty in breathing while playing cricket Ambegaon taluka  
पुणे

Pune News : क्रिकेट खेळताना दम लागला अन्...; एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Pune News : कार्तिक हा एकुलता एक मुलगा होता तरुण वयातच एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने विधाटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील कार्तिक विष्णू विधाटे (वय २१ वर्ष) या तरुणाला क्रिकेट खेळताना दम लागल्याने घरी जाऊन झोपला असता कार्तिकचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली कार्तिक याचा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पारगाव कारखाना पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

धामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहीकेवर चालक असलेले विष्णू विधाटे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलीचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. कार्तिक हा एकुलता एक मुलगा होता तरुण वयातच एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने विधाटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून धामणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार्तिक याच्या मागे आई-वडील, आजी आजोबा असा परिवार आहे.

कार्तिक विधाटे हा भोसरी येथे खासगी कंपनीत काम करत होता. दोन-तीन दिवसांपूर्वी तो कामानिमित्त गावी धामणीला आला होता. काल रविवारी गावातील मित्रांबरोबर तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता क्रिकेट खेळताना त्याला दम लागला. त्यानंतर तो दुपारी अडीच वाजल्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी आला व त्याच्या खोलीत जाऊन झोपला. त्यानंतर अर्ध्या तासाने त्याची आई अलका विधाटे या त्याला उठवण्यासाठी गेली असता तो उठला नाही. त्यावेळी त्याला कुटुंबीयांनी पारगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतर कार्तिकी याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. कार्तिकी याचा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT