India Book of Records
India Book of Records sakal
पुणे

India Book of Records : 240 फूट नवरा सुळका सर करीत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये झाली नोंद ! ; आरुडे कुटुंबाचा अनोखा विक्रम

सकाळ वृत्तसेवा

राजगुरूनगर (ता.खेड) : येथील गिर्यारोहक श्री अजित आरुडे (वय-44) आणि सौ .सुनिता आरुडे (वय-38) या दाम्पत्याने एक आगळा वेगळा छंद जोपासत ,अभिनव आरुडे(वय-15) अद्वय आरुडे(वय-8)या आपल्या मुलांसमवेत ,नाशिक-त्र्यंबकेश्वर जवळील ,पहिने या गावातील 90अंश कोनातील 240 फूट उंच 'नवरा' सुळका सर करीत अनोखा विक्रम केला आहे.त्यांच्या या कामगिरी ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली असून ,अशाप्रकारे सर्व कुटुंबाने एकाच वेळी असे रेकॉर्ड बनवणे ही देशातील पहिलीच घटना आहे.

खेड तालुक्यातील तिन्हेवाडी (राजगुरूनगर) येथील अजित आरुडे हे खाजगी कंपनीत नोकरी करतात ,तर सुनिता आरुडे या आंबोली या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका आहेत.या कुटुंबाने यापूर्वी कळसुबाई ,लिंगाणा ,अलंग -मदन-कुलंग ,वजीर सुळका ,वानरलिंगी सुळका,कलावंतीण दुर्ग ,मलंगगड असे विविध अवघड ट्रेक पूर्ण केले आहेत. आपल्या मुलांमध्ये तसेच समाजामध्ये आपल्या ऐतिहासिक समृद्ध वारशाचे व पर्यावरण संरक्षणा चे संस्कार व्हावेत यासाठी दर रविवारी हे कुटुंब मुलांसमवेत गड किल्ले भटकंती ,प्लास्टिक मुक्त गडकिल्ले ,अशा विविध मोहिमेत सहभाग घेतात.

प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा दिनाच्या निमित्ताने टीम फोर्ट ऍडव्हेंचर व एम एम आर आयोजित ,सहयाद्री खोऱ्यातील अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या नवरा सुळका आरोहण मोहिमेत ,या संपूर्ण कुटुंबाने सहभाग घेतला.प्रचंड वारा ,आगी मोहोळ माशा ,कठीण कातळ कडा ,अशा संकटांना सामोरे जात,सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या कालावधीत हा सुळका सर करून 240 फूट सुळक्यावरून रामलल्लाना अभिवादन केले.

योगायोग असा की ,श्रीराम नवमी च्या दिवशीच या विक्रमाची नोंद या कुटुंबाच्या नावावर झाली.त्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन नुकतेच गौरविण्यात आले.सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. यापुढील काळात महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांना भेटी देणे व जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा त्यांचा मानस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT