25 lakh check to Raigad home guard lost his leg in accident pune sakal
पुणे

Pune News : अपघातात पाय गमावलेल्या रायगडच्या होमगार्डला २५ लाखांचा धनादेश

होमगार्डसच्या इतिहासात पहिलीच घटना, महाराष्ट्रातील होमगार्डना विम्याचे कवच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अपघातात जखमी झाल्यामुळे पाय गमवावा लागलेल्या रायगड येथील होमगार्ड लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांना विम्याच्या रकमेपोटी २५ लाख रुपयांचा धनादेश पोलिस महासंचालक (होमगार्ड) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. होमगार्डसच्या इतिहासात प्रथमच २५ लाखांचा धनादेश देण्याची ही पहिलीच घटना आहे.

मागील पाच सप्टेंबर २२ रोजी होमगार्ड लक्ष्मण आखाडे हे ड्यूटीवर असताना भीषण अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला होता. दरम्यान, पोलिस महासंचालक (होमगार्ड) डॉ. उपाध्याय यांनी पोलिस विभागाच्या धर्तीवर पगार खाती उघडून एचडीएफसी बँकेशी विम्याबाबत करार केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील होमगार्डस॒ना सर्व विम्याचे लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे.

मुंबई येथील पोलिस महासंचालक (होमगार्ड) कार्यालयात १६ जानेवारी रोजी आखाडे यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला. अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग, रायगडचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, ‘एचडीएफसी’चे अधिकारी कोचर, सावंत यांच्यासह अन्य अधिकारी वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT