Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Property Tax : महापालिकेच्या तिजोरीत अडीचशे कोटीचा मिळकतकर भरणा

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निवासी मिळकतकरावर १० टक्क्यापर्यंत सूट असल्याने महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निवासी मिळकतकरावर १० टक्क्यापर्यंत सूट असल्याने महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २६ दिवसात २५३ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. या दोन महिन्यात एक हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी शक्यता प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेतर्फे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात २५ हजारापर्यंत मिळकतकर असणाऱ्या नागरिकांना १० टक्के, तर त्यापेक्षा जास्त रकमेचा मिळकतकर असल्यास ५ टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोनाच्या काळात सर्व उद्योग, बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नाला ओहोटी लागलेली होती. पण या कालवधीत सुद्धा पुणेकरांनी मिळकतकर भरून महापालिकेला मोठा हातभार लावला होता.

२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मिळकतकरातून २५४९ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निवासी मिळकतकर या दोन महिन्यात भरणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत ११ लाख ५० हजार नागरिकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आली आहेत. पुढील आठवड्यापर्यंत पोस्टाने हे बिल नागरिकांना मिळीतल. तसेच एसएमएस, इमेलद्वारे देखील बिल पाठविण्यात आलेले आहे.

उपायुक्त माधव जगताप म्हणाले,‘‘एप्रिल आणि मे महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आज (ता. २६) पर्यंत १ लाख ७७ हजार ४८५ नागरिकांनी २५३कोटी ४५ लाख रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला आहे. आणखी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असून, यामध्ये पुणेकरांकडून कर भरणा मोठ्या प्रमाणात होईल.

गेल्या वर्षी २५ कोटी जमा

गेल्यावर्षी मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे त्यानुसार बिल तयार करण्यासाठी बराच वेळ लागल्याने एप्रिल महिन्यात ५ ते १० टक्क्यांची सवलत मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत २५ कोटी रुपयेच पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. मात्र, मे महिन्यात ही सवलत मिळताच सुमारे ११०० कोटी रुपये पुढील दोन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT