11th_Admission 
पुणे

अकरावी प्रवेशासाठी 'इतक्या' महाविद्यालयांनी केले रजिस्ट्रेशन; नोंदणीचा आज होता शेवटचा दिवस!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शेवटच्या दिवशी २९७ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ३८ महाविद्यालयांच्या अर्जात त्रुटी असल्याने पुढील दोन दिवसात त्यांची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव व सहाय्यक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी दिली. 

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रवेश दिले जातात. यंदा पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील महाविद्यालयांचाही समावेश यात करण्यात आला आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जी महाविद्यालये सहभाग घेणार नाहीत तेथे प्रवेश होणार नाहीत, असे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार ज्या महाविद्यालयांनी नोंदणी केलेली नाही, त्यासाठी मुदतवाढ दिली होती, ती आज (बुधवारी) संपली. या प्रतिक्रियेत ३०४ महाविद्यालये सहभागी होणे अपेक्षित होते, संध्याकाळपर्यंत २९७ महाविद्यालयांची नोंदणी झाली आहे. 

या महाविद्यालयांमध्ये कला शाखेचे १३ हजार ४२१, वाणिज्य शाखेचे ३७ हजार ७८४, विज्ञान शाखेचे ३८ हजार ५०, तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी ३ हजार ९४५ अशी एकूण ९३ हजार २०० प्रवेश क्षमता निर्माण झाली आहे. ३८ महाविद्यालयांची छाननी पूर्ण झाल्यानंतर ही प्रवेश क्षमता वाढणार आहे. तसेच ११वी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका साॅफ्टकाॅपीमध्ये उपलब्ध होणार असल्याने त्याची किंमत १५० ऐवजी १२५ रुपये करण्यात आली आहे, असे शेंडकर यांनी सांगितले. 

फक्त २५ हजार विद्यार्थ्यांनी केला सराव
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडतो, त्यामुळे १६ जुलै ते २४ जुलै या कालावधीत प्रवेश अर्जातील पहिला भाग करण्याचा सराव करण्याचे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना केले होते, मात्र आज अखेर केवळ २५ हजार ३२ जणांनीच अर्ज भरण्याचा सराव केला आहे. १ लाख प्रवेश होतात, त्या तुलनेत ही संख्या कमी आहे, असे शेंडकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT