पुणे

‘गौरी शुगर’कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४६ कोटी जमा

CD

न्हावरे, ता.२३ : शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ओंकार ग्रुपच्या गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने नुकत्याच झालेल्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक व ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४६ कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रेपाटील यांनी दिली.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व वाहतूकदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोत्रे यांनी बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, की गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचे चालू वर्षाचे गाळप आठ लाख १४ हजार ६७१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये शिरूर तालुक्यातील ८६ हजार टन ऊस गाळप केला आहे. चालू वर्षी कारखाना व्यवस्थापनाने उसाला ३००६ टन बाजारभाव दिला. ऊस वाहतूकदारांनी ऊस तोडीबाबत करार करताना काळजी घ्यावी. तसेच आपण ऊस तोडी करणाऱ्यांना रक्कम देतो ती रक्कम बँकेच्या माध्यमातून द्यावी. अनेक ऊस तोडी करणारे मुकादम हे अनेक ऊस तोडी करणाऱ्या ऊस वाहतूकदारांकडून पैसे घेत असतात पण नंतर ऊस गाळप हंगाम सुरू झाला की ते येत नाहीत त्यामुळे ऊस वाहतूकदार संकटात सापडतो. त्यामुळे सुरुवातीला करार करताना ऊस वाहतूकदारांनी काळजी घ्यावी. तसेच ऊसतोडीसाठी पुढील वर्षी हार्वेस्टरचा वापर करावा तसेच हार्वेस्टर घेण्यासाठी अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा देखील लाभ घ्यावा.


शिरूर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, दौंड, करमाळाआदी परिसरातून ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील वर्षी गाळपासाठी गौरी शुगर कारखान्याला ऊस द्यावा. शेतकऱ्यांनी बाजारभावाची चिंता करू नये. तुम्ही केलेले कष्टाची जाण ठेवून बाजारभाव चांगलाच देणार आहे.
- बाबूराव बोत्रे पाटील, अध्यक्ष, ओंकार ग्रुप

02007

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT