Crime-Scene
Crime-Scene 
पुणे

पिंपरी चिंचवड शहरातील ४० गुंड तडीपार

संदीप घिसे

पिंपरी - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकणमधील तब्बल ४० जणांना तडीपार केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडीपार केलेल्यांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

अनेक सराईत गुन्हेगार परिसरात आपले बस्तान बसवितात. अटक झाल्यावर जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा गुन्हे करतात. त्यांच्या दहशतीमुळे अनेकदा नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. याचाच गैरफायदा घेत ते आणखी गुन्हे करतात. त्यांची ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस अशा सराईत गुन्हेगारांना तडीपार करतात. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तांची स्थापना सहा महिन्यांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली. त्या वेळी शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत होत्या. या गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी दिले. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यातील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. या यादीतील गुन्हेगारांना तडीपार करण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. परिमंडळ एकमधील तब्बल २४ जणांना तर परिमंडळ दोनमधील १४ जणांना पोलिसांनी तडीपार केले आहे. 

परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी बुधवारी (ता. ३०) पाच जणांना प्रत्येकी दोन वर्षासाठी तडीपार केले. सुरेश ऊर्फ चिम्या शांताराम निकाळजे (वय ४२, रा. आदर्शनगर, पिंपरी), चंद्रकांत अनंत माने (वय २६, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव), सुदर्शन ऊर्फ पिन्या संभाजी राक्षे (वय २२, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी), सोमनाथ ऊर्फ तम्मा हनुमंत लष्करे (वय २१, रा. निगडी), नीलेश भाऊसाहेब कोळपे (वय ३१, रा. चिंचवड) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. निकाळजे हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

SCROLL FOR NEXT