corona
corona 
पुणे

पुरंदरकरांची सुरू आहे कोरोनाशी जोरदार लढाई....40 जणांनी मिळवलाय विजय

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : पुरंदर तालुक्यातील तब्बल 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, ही दिलासादायक बाब असताना काल रात्री कोरोनाचा चौथा  बळी गेला आहे. मात्र, तरीही सासवडचा लाॅकडाउन थोडा फायदेशीर ठरत आहे. आज सासवडचे फक्त दोन व ग्रामीणमधील वाघापूरचा एक रुग्ण पाॅझिटिव्ह आला. त्यातून सासवड शहरातील लाॅकडाउन पंधरा दिवस पुढे नेण्यासारखी दुसरी उपाययोजना हातात नाही. तसेच, पुणे व बाहेर गावाहून ये- जा करणारांना 'होम क्वारंटाइन' पद्धतीत रोखले, तर अजून नियंत्रण मिळण्याच्या आशा आहेत.

सासवड शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आज दोनने वाढून शहर 81 वर पोचले. तर, आज तालुक्यातील वाघापूर गावात कोरोनाचा एक रुग्ण सापडला. तालुक्यातील रुग्ण संख्या 116 वर पोचली. विशेष म्हणजे गुरोळी, मांढर व सासवड पाठोपाठ हा धनकवडीचा तालुक्यातील कोरोनाबाधितचा चौथा बळी काल रात्री ठरला. कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण 3.44 टक्के आहे. तर, बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. दुसरीकडे पाॅझिटिव्ह 116 रुग्णांपैकी 40 कोरोनामुक्त झाले; तरी तब्बल 72 रुग्ण रुग्णालयात आहेत.  

निष्काळजीपणा जास्त वाढलेल्या लोकांमुळे कोरोनाबाधित लोक वाढत आहेत. कन्टेन्मेंट झोन सील झाली, तर हा संसर्ग रोखणे शक्य होईल. परंतु, कन्टेन्मेंट झोन बांबू व पत्रे लावून बंदिस्त केली; तरी हे लोक गावभर फिरताहेत, असे दिसत आहे. होम क्वारंटाइनला हरताळ न फासल्यास नियंत्रण शक्य आहे. आजही पुरंदर तालुक्यातील एकूणात 70 टक्के रुग्ण एका सासवड शहरातील आहेत. त्यातून सासवड शहरात लक्ष देणे गरजेचे आहे.

याबाबत तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी रुग्ण संख्येची माहिती दिली. ग्रामीणमधील कन्टेन्मेंट झोन व गावेही वाढत आहेत. सासवडचे कन्टेन्मेंट झोन तीसपर्यंत गेल्याने नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी  परवापासून सासवड शहरात लाॅकडाउन केला. शहरातील  रुग्ण आढळण्यात खंड नसल्याने तो वाढण्याची शक्यता आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT