Corona_Danger.jpg
Corona_Danger.jpg 
पुणे

सिंहगड रस्ता परिसराला कोरोनाचा विळखा...

सकाळवृत्तसेवा

सिंहगड रस्ता (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरात कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून रूग्ण संख्या 427 वर जाऊन पोहचली आहे. पुण्यातील पहिला रूग्ण सिंहगड रस्ता परिसरात आढळला होता. मार्च महिन्यात पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यापर्यंत रूग्ण संख्येत फारशी वाढ झाली नव्हती. सिंहगडरस्ता वासिय, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, प्रशासन, पोलिस या सगळ्यांच्या प्रयत्नातून येथील रूग्ण संख्येत वाढ झाली नाही. येथील संख्या केवळ 13 होती. परंतु, त्यानंतर त्यात वाढ झाली. 

कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. कोरानाची रूग्ण संख्‌या ही तिप्पट झाली. त्यावेळी ही संख्या 39 होती. मे महिन्यातील रूग्ण संख्येत मात्र झपाट्याने वाढ होऊन आता 427 झाली आहे. सिंहगडरस्ता परिसरातील पानमळा, दांडेकर पूल, जनता वसाहत जुनी वीट भट्टी, आनंदनगर, हिंगणे, माणिकबाग, वडगाव, धायरी, धायरी गाव, नऱ्हे आदी भागात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली त्यामुळे ही संख्या थेट आता 427 वर पोहचली आहे.

पानमळा, वीट भट्टी, जनता वसाहत, दांडेकर पूल याभागात प्रशासनाच्या वतीने पत्रे लावून सील करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासोबतच जो भाग सर्वाधिक रूग्ण संख्या असलेला आहे. अशा भागातूनच इतर भागात कामावर जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. यात स्वच्छता कर्मचारी, तसेच घरेलू कामगार आणि इतरांचा समावेश आहे. अशा वेळी इतर ठिकाणी नसलेल्या भागात देखील रूग्ण संख्या वाढण्याची भिती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन काम करणे गरजेचे असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT