Cosmos-bank
Cosmos-bank 
पुणे

कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला; पाच जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून ९४ कोटी रुपये लांबविल्या प्रकरणात सायबर पोलिसांनी ४०० पानांचे तिसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. सलमान नयीम बेग (वय ३१), सेहबाज फारुख शेख (वय २९), शाहबाज अरीफ खत्री (वय ३०), आसिफ जमील शेख (वय ३१, सर्व. रा. ठाणे) व फिरोज यासीन शेख (वय ३७, रा. मुंबई) यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. हे पाचही संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, त्यांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. १३ जणांविरोधात पोलिसांनी यापूर्वी दोषारोपपत्र सादर केले आहे. त्यानंतर या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी राजस्थानमधील जयपूर आणि मध्य प्रदेशातील इंदोर येथून एकूण ६१ लाख रुपये काढल्याचे तपासात समोर आले आहे. याचा तपास झाल्यानंतर या पाच जणांविरोधात ४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी डिसेंबर २०१८ मध्ये १ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी अडीच हजार पानांचे दुसरे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT