500 toilets in this years Undavdi Supe area under Nirmalvari program 
पुणे

निर्मलवारी उपक्रमाअंतर्गत यंदा उंडवडी सुपे परिसरात 500 शौचालय

विजय मोरे

उंडवडी  : वारीच्या वाटेवर स्वच्छता राहावी, व वारकरी शौचासाठी उघड्यावर जावू नये. यासाठी यंदा जिल्हा परिषदेच्या वतीने निर्मलवारी या उपक्रमाअंतर्गत उंडवडी सुपे व खराडेवाडी (ता. बारामती) या दोन गावात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर फिरते शौचालय युनिट उभारण्यात येणार आहेत. यामध्ये उंडवडी सुपे परिसरात 300 व खराडेवाडी परिसरात 200 अशी 500 शौचालय युनिट उभे करण्यात येणार आहेत. या युनिट उभारण्यासाठी जागेची पाहणी निर्मलवारीचे महामार्ग प्रमुख किरण ढमडेरे, माऊली कुडले, रवींद्र दोरगे व बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केली. 

यावेळी विस्तार अधिकारी दत्तात्रेय खंडागळे, सरपंच एकनाथ जगताप , ग्रामपंचायत सदस्या रंजना गवळी, रेणूका गवळी, अंजना गवळी, ज्ञानदेव जगताप, भगवान माकर, माजी सरपंच बापूराव गवळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गवळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

निर्मलवारी या उपक्रमाअंतर्गत येथे खाजगी मालकीचीही वैयक्तिक शौचालय वारीतील वारकऱ्यांना खुली करुन देणार आहेत. यामध्ये उंडवडी सुपे येथे 165 व खराडेवाडी येथे 69 शौचालय वारकऱ्यांना वापरण्यासाठी खुली करुन देण्यात येणार आहेत.  यंदा वारीच्या वाटेवर दुर्गंधी आणि घाण होणार नाही.यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी निर्मलवारीची व स्थानिक टीम काम करणार आहे. त्यामुळे यंदा वारीच्या वाटेवर स्वच्छता राहण्यास मोठी मदत होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT