लोगो : उद्योग बॅंक व्याख्यानमाला
---
PNE26W52005
---
‘५ डी’च्या माध्यमातून यशाचा मार्ग साधा
ऋषीकेश कुलकर्णी; ‘सोलापूरचे कौशल्य’ विषयावर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : सोलापूरच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आणि मेहनतीची क्षमता आहे. मात्र, मोठ्या अपेक्षांनुसार प्रयत्न करणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी यशासाठी ‘५ डी’वर लक्ष केंद्रित करावे. यामध्ये डिक्लेरेशन, डेडिकेशन, डिटरमिनेशन, डिसिप्लिन आणि डेडलाइनचा समावेश आहे, असे मार्गदर्शन ऋषीकेश कुलकर्णी यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी (ता. २१) रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी आणि उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत ‘सोलापूरचे कौशल्य - सोलापूरच्या विकासासाठी’ या विषयावर कुलकर्णी यांनी सातवे पुष्प गुंफले.
कुलकर्णी म्हणाले, सोलापुरातील अनेक कंपन्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. मात्र, विद्यार्थी पुणे आणि मुंबईतील जीवनशैलीकडे आकर्षित होतात. त्याऐवजी सोलापुरातच रोजगाराच्या संधी स्वीकाराव्यात. स्थानिक पातळीवर काम केल्याने वेळेचे नियोजन करता येते. त्यातून अतिरिक्त अभ्यास किंवा कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम करता येतात. तसेच कुटुंबासाठीही अधिक वेळ देता येतो.
वक्त्यांचा परिचय व्याख्यानमाला अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांनी करून दिला. प्राचार्य एम. एम. बीडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठल वंगा यांनी आभार मानले. यावेळी परशुराम रापेल्ली, सिद्धेश्वर गड्डम, अंबादास गड्डम, गणेश इराबत्ती, प्रकाश गंजी, रघुनाथ उडता, प्रेम चव्हाण, शिक्षक आदी उपस्थित होते.
---
चौकट
प्रसन्न खटावकर यांचे आज व्याख्यान
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर यांचे मंगळवारी (ता. २२) ‘विद्यार्थ्यांच्या ताणतणावाचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. नवीन विडी घरकुल येथील श्री मार्कंडेय हायस्कूलमध्ये सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.