सांगावडे - येथील ग्रामस्थांनी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी रोख स्वरूपात मदत केली. या वेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ.
सांगावडे - येथील ग्रामस्थांनी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी रोख स्वरूपात मदत केली. या वेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ. 
पुणे

विवाह सोहळ्यासाठी ६० जणांची नोंदणी

सकाळवृत्तसेवा

बेबडओहोळ - मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या २०१ सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी १९८ गावांत जनजागृती करण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांत ६० नोंदणीसह पवन मावळातील २८ गावांतील ग्रामस्थांनी या विवाह सोहळ्याला प्रतिसाद देत मदत व रोख स्वरूपात रक्कम दिली.
सोमाटणे, बेबडओहोळ, शिवणे, मळवंडी-ढोरे, आर्डव, येलघोल, भडवली, शिवली, धनगव्हाण, परंदवडी, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगावडे, कुसगाव पमा, पाचाणे, पुसाणे, दिवड, राजेशाही, ओव्हळे, दिवड, डोणे, आढले खुर्द, आढले बुद्रुक व चांदखेड या गावांतील बचत गट, मंडळे व दानशूरांनी सोहळ्यात मदत व काम करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन दिवसांत जनजागृती यात्रेत अनेकांनी अन्नदानासाठी व तरुणांनी भोजन, वाढपी व्यवस्थेत नावे नोंदवली.

यात ४७ दानशूर व्यक्तींनी प्रत्येकी २१ हजार रुपये देऊन ४७ लग्ने दत्तक घेतली आहेत. २८ तरुण मित्र मंडळ व ७ ढोल पथके भोजन व्यवस्थेत श्रमदान स्वरूपात भोजन वाढण्याचे काम करणार आहेत. ३८ महिला बचत गट श्रमदान स्वरूपात भोजन व्यवस्थेत भोजन वाढण्याची काम करणार आहेत. ६८ दानशूर व्यक्तींनी अन्नदानासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये मदत देऊ केली आहे. कान्हे येथील किशोर सातकर यांचे २०० माथाडी कामगार तसेच मोरया पॅकेजिंग इंडिया प्रा. लि या कंपनीचे ८० कामगार व महिंद्रा कंपनीचे ५० कामगार श्रमदान स्वरूपात भोजन वाढण्याचे काम करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT