PMP-Bus
PMP-Bus 
पुणे

पीएमपीत ६०० चालकांची भरती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या नव्या बससाठी सुमारे ६०० चालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण करून महिनाअखेरीस ते रुजू होतील. त्यामुळे मार्गावर येणाऱ्या पीएमपीच्या बसची संख्या १०० ते १५० ने वाढून प्रवाशांची चांगल्याप्रकारे सोय होणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सहा महिन्यांत १२० ई-बस दाखल झाल्या. तत्पूर्वी, २३५ मिडी आणि सीएनजीवरील ४०० बस दाखल झाल्या. परंतु, चालकांची पुरेशी संख्या नसल्याने त्यातील शंभरहून अधिक बस रोज आगारांतच ठेवाव्या लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीने चालकांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार ६९४ चालक पात्र ठरले. त्यांची वजन, उंची आणि शारीरिक चाचणी आदींबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किमान ६०० उमेदवार चालक म्हणून नियुक्त होऊ शकतात. त्यांना एक महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ते पीएमपीच्या सेवेत रुजू होतील. त्यांच्या नियुक्‍त्या पहिल्या टप्प्यात बदली चालक म्हणून असेल, असे प्रशासनाने सांगितले.

राष्ट्रीय निकषांनुसार एका बसमागे सुमारे तीन चालक आवश्‍यक आहेत. उपलब्ध असलेले चालक सकाळ आणि सायंकाळ, अशा दोन शिफ्टमध्ये विभागले आहेत. त्यातही अनेकांच्या रजा, सुट्यांचा आढावा घेतला; तर बस जास्त आणि चालक कमी, असे प्रमाण झाले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे चालक नियुक्तीच्या प्रक्रियेस वेग आला आहे. चालक मिळाल्यास किमान एक हजार फेऱ्या वाढतील. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा मिळतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

नव्या बस ज्या प्रमाणात उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात चालकांच्या नियुक्‍त्या करण्यात येतील. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे. चालकांअभावी बस बंद राहू नये, यासाठी काळजी घेण्यात येईल. 
- अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT