school sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रात ७६८ शाळा

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची प्राथमिक यादी बुधवारी (ता. १६) जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची प्राथमिक यादी बुधवारी (ता. १६) जाहीर केली आहे.

पुणे - प्राथमिक शिक्षकांच्या (Primary Teacher) जिल्हांतर्गत बदल्यांसाठी जिल्हा परिषदेने (ZP) जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची (Schools) प्राथमिक यादी बुधवारी (ता. १६) जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील ७६८ शाळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या यादीवर येत्या २२ मार्चपर्यंत शिक्षकांना हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील सर्वाधिक १५२ शाळा या मावळ तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, हवेली, शिरूर या पाच तालुक्यांमध्ये अवघड क्षेत्रातील एकही प्राथमिक शाळा नसल्याचे या यादीतून उघड झाले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हानिहाय सुगम व दुर्गम (अवघड व सोपे क्षेत्र) क्षेत्रातील शाळांची तालुकानिहाय यादी तयार करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला होता. यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने या याद्या आता त्या त्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना जाहीर करण्यासाठी पाठवल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांचे नवे धोरण गेल्या वर्षी राज्य सरकारने जाहीर केले आहे. यामुळे बदल्यांचे जुने धोरण रद्द झाले आहे. मात्र राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग चालू असल्याने, नवीन बदली धोरणानुसार अद्याप एकदाही शिक्षकांच्या बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अवघड क्षेत्रात सर्वाधिक काळ काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदल्यांच्या वेळी दिलासा देण्यासाठी त्यांना सोप्या क्षेत्रातील शाळांवर नवी नियुक्ती देता यावी आणि अनेक वर्षे सोप्या क्षेत्रातील शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यासाठी या अवघड व सोप्या क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर केली जाते.

संकेतस्थळावर याद्या उपलब्ध

पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांच्या तालुकानिहाय याद्या या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी जिल्हा परिषदेच्या www.punezp.mkcl.org या संकेतस्थळावर या याद्या पाहता येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

अवघड क्षेत्र तालुकानिहाय शाळांची संख्या

  • आंबेगाव --- १०१

  • बारामती --- शून्य

  • भोर --- ७४

  • दौंड --- शून्य

  • हवेली --- शून्य

  • इंदापूर --- शून्य

  • जुन्नर --- ९०

  • खेड --- १०२

  • मावळ --- १५२

  • मुळशी --- १०२

  • पुरंदर --- ३१

  • वेल्हे --- ११६

  • एकूण --- ७६८

राज्य सरकारने अवघड क्षेत्राची शाळा निश्‍चित करण्यासाठी एकूण सात निकष निश्‍चित करून दिले आहेत. यापैकी किमान तीन निकषांची पुर्तता करणारी शाळा ही अवघड क्षेत्रातील ग्राह्य धरण्यात यावी, असे सरकारने सांगितले होते. या निकषांनुसार पुणे जिल्ह्यातील ७६८ शाळा निश्‍चित केल्या आहेत. याबाबत काही शंका असल्यास, त्या दूर करता याव्यात म्हणून हरकती व सूचना मागविण्यात आल्या

आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT