Crime Sakal
पुणे

Crime News : 80 हजार रुपये किमतीचा सुमारे आठ किलो गांजा पकडला

राजगड पोलिसांनी सोमवारी सकाळी खेड शिवापूर टोल नाक्यावर एका मोटारगाडीतून सुमारे 80 हजार रुपये किमतीचा सुमारे आठ किलो गांजा पकडला.

महेंद्र शिंदे

राजगड पोलिसांनी सोमवारी सकाळी खेड शिवापूर टोल नाक्यावर एका मोटारगाडीतून सुमारे 80 हजार रुपये किमतीचा सुमारे आठ किलो गांजा पकडला.

खेड-शिवापूर - राजगड पोलिसांनी सोमवारी सकाळी खेड शिवापूर टोल नाक्यावर एका मोटारगाडीतून सुमारे 80 हजार रुपये किमतीचा सुमारे आठ किलो गांजा पकडला. आरोपींच्या ताब्यातील मोटारगाडी आणि गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ईस्माईल बाबु सय्यद ( वय ३०, रा. कनगल्ला, ता. हुकेरी, जि. बेळगांव, सैफाली शब्बीर सुतार (वय २३, रा. निपानी, ता. हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक, जैनुल गजबार मुल्ला (वय ३५, रा. सोलापूर दर्गा गल्ली, ता.हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक, जिआउल रेहमान रियाज मुजावर (वय २०, रा. हरणापूरगड, ता.हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक, आजु अजगर अल्ली खान (वय २१, रा. माणखुर्द, मुंबई) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. सोमवारी सकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी वाहनांवर वाहतूक कारवाई करत होते. यावेळी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने जाणारी एक मोटारगाडी वाहतूक पोलिसांना संशयास्पद वाटली. ही मोटारगाडी बाजूला घेऊन पोलिसांनी त्या मोटारगाडीची तपासणी केली. यावेळी त्या मोटारगाडीत ठेवलेल्या एका प्रवासी बॅगेत गांजा आढळून आला.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील मोटारगाडी आणि सुमारे 80 हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा जप्त केला. तसेच याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, सचिन कदम, निलेश होवाळ, अमोल सूर्यवंशी, अजित माने, संतोष तोडकर, वाहतूक वार्डन पंकज शिंदे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT