80 kg meat seized cattle smugglers kirkatwadi haveli police station case filed pune crime esakal
पुणे

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथून ऐंशी किलो संशयित गोमांस जप्त

विक्रेत्याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ जयप्रकाश नारायण नगर येथील आलिया मटन शॉप या दुकानातून हवेली पोलिसांनी ऐंशी किलो संशयित गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी शफीक इक्बाल कुरेशी (वय 25 रा. दांडेकर पूल,पुणे) याच्या विरोधात गुन्हा करण्यात आला असून जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

सिंहगड रस्त्यावरील जयप्रकाश नारायण नगर (नांदेड) येथील आलिया मटन शॉप या दुकानात गोमांस विक्री केले जात असल्याची माहिती पतित पावन संघटनेच्या खडकवासला विभागाचे उपाध्यक्ष सौरभ सुहास कुलकर्णी यांनी 112 नंबरवर फोन करून नियंत्रण कक्षाला दिली होती.

त्यानुसार हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शितल ठेंबे व पोलीस हवालदार संतोष तोडकर हे सौरभ कुलकर्णी यांनी कळविलेल्या ठिकाणी दाखल झाले.

संबंधित मटन विक्रेत्याकडे मटन विक्रिचा परवाना होता परंतु विक्रीसाठी ठेवलेले गोमांस सदृश मांस असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सर्व मांस ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले मांस ऐंशी किलो वजनाचे असून त्याचे नमुने औंध येथील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाठविण्यात आले आहेत. संबंधित विक्रेत्याच्या विरोधात गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT