886 crore loan waiver in Pune district
886 crore loan waiver in Pune district 
पुणे

पुणे जिल्ह्यात ८८६ कोटींची कर्जमाफी; सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

गजेंद्र बडे

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आज अखेरपर्यंत (ता.२३) पुणे जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ५४३ शेतकऱ्यांचे ८८६ कोटी १४ लाख रुपयांचे पीक कर्ज माफ झाले आहे. कर्जमाफीची ही रक्कम या सर्व शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत पीक कर्ज माफ झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ८६ हजार १६२ शेतकऱ्यांनी यंदा पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ६०२ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज नव्याने घेतले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्य सरकारने पीक कर्जमाफी योजनेला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ असे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार ३४६ शेतकऱ्यांची कर्ज खाती सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत. यापैकी १ लाख २६ हजार ४९३ खाते आधार प्रमाणीकरणासाठी पुणे जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहेत. यापैकी १ लाख २५ हजार ९१४ कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण बॅंकेच्यावतीने पूर्ण करण्यात आले आहे.

पूर्वीचे कर्जमाफ झाल्यानंतर पुन्हा यंदा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण सुमारे ७० टक्के एवढे आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण राज्यात सर्वाधिक ठरले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

पुणे जिल्हा बँकेला चालू वर्षाच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी अग्रणी बॅंकेने २ हजार १०४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आज अखेरपर्यंत २ हजार २१ कोटी ६२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९१.७० टक्के इतके झाले आहे.

कोट राज्यातील अन्य जिल्हा बॅंकांच्या तुलनेत पुणे जिल्हा बॅंकेने सर्वाधिक पीक कर्ज वाटप केले आहे. शिवाय कोरोनामुळे उदभवलेल्या स्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ आणि पीक कर्ज व्याजात सवलत दिली आहे. - रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बॅक, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT