972 people were bitten dogs in three months ambegaon animal protection act health  sakal
पुणे

Dog Bite : तीन महिन्यात 972 जणांना कुत्र्यांनी घेतला चावा; भटक्या व घरगुती कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

विशेषतः लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक

डी के वळसे पाटील

मंचर :आंबेगाव तालुक्यात मोकाट कुत्र्याचा वावर व उपद्रव वाढला आहे. लग्न सराई व यात्रांच्या हंगामात गेल्या तीन महिन्यांत ९७२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या नोंदी मंचर उपजिल्हा रुग्णालय , घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येआहेत. विशेषतः लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी असूनही मुलांना घरातच बसावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लग्न सराई व यात्रांचा हंगाम सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाण व मंगलकार्यालयात जेवणावळी झाल्या नंतर अनेकदा ताटात शिल्लक राहिलेले अन्न उघड्यावरच टाकून दिले जाते. परिणामतः तेथे भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या तळ ठोकून असतात.तेलकट पदार्थांचे सतत सेवन केल्याने कुत्री पिसळण्याची संख्या वाढते. अंगणात खेळणाऱ्या किंवा रस्त्याने ये-जा करताना हातात खाद्यपदार्थ असलेल्या लहानग्यांवर कुत्री हल्ला करतात.

आंबेगाव तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत. लहान गावांमध्ये सरासरी १५ ते २० व मोठ्या गावांमध्ये २५-५० हून अधिक मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.

“आंबेगाव तालुक्यात भटक्या कुत्र्यांप्रमाणे घरगुती पाळीव कुत्र्यांनीही चावा घेतलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गावपातळीवर सर्व कुत्र्यांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायत व मंचर नगरपंचायत स्तरावर सर्व कुत्र्यांना प्रतिबंधात्मक रेबीज लस देण्याची मोहीम राबविण्याची गरज आहे.”

डॉ. तुषार पवार, आरोग्य अधिकारी आंबेगाव तालुका.

आंबेगाव तालुक्यात मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालयव नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ९७२ जणांना श्वानदंश झाला आहे. मंचर उपजिल्हा रूग्णालयात सर्वाधिक श्वानदंश झालेल्या २७५ जणांना उपचार केलेल्या नोंदी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT