result
result 
पुणे

दौंड तालुक्यातील 98 टक्के मुलींची बाजी

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात दहावीच्या परीक्षेचा सरासरी शेकडा निकाल ९६.९५ टक्के इतका लागला आहे. तालुक्यात उत्तीर्णांपैकी मुलींचे प्रमाण ९८.१८ टक्के, तर मुलांचे प्रमाण ९५.९० टक्के इतके आहे. तब्बल ३५ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

दौंड तालुक्यातून परीक्षेस बसलेल्या ५३८२ विद्यार्थ्यांपैकी ५२१८ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी विशेष प्राविण्य गटात २०९९, प्रथम श्रेणी गटात १९८२ तर द्वितीय श्रेणी गटात ९५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सन २०१८ मध्ये तालुक्यात दहावीच्या शेकडा निकाल ८९.७१ टक्के निकाल लागला होता व एकोणीस विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला होता. सन २०१९ मध्ये तालुक्यात दहावीच्या शेकडा निकाल ८४.४० टक्के निकाल लागला होता व आठ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला होता.

दौंड तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे : सेंट सेबॅस्टियन हायस्कूल (दौंड), जयहिंद विद्यालय (कासुर्डी), नागनाथ विद्यालय (वरवंड), श्री भानोबा विद्यालय (कुसेगाव), जेधे विद्यालय (बोरीपार्धी), राज्य राखीव पोलिस पब्लिक विद्यालय (दौंड), श्रीयोग माध्यमिक विद्यालय (बेटवाडी), भैरवनाथ विद्यालय (सोनवडी), नानासाहेब पवार आश्रमशाळा (सोनवडी), श्री भैरवनाथ विद्यालय (खोर), मेरी मेमोरियल विद्यालय (पाटस), जिजामाता विद्यालय (गोपाळवाडी), जनता माध्यमिक विद्यालय (दौंड), राजेश्वर विद्यालय (राजेगाव), राजेभोसले विद्यालय (खानवटे), गुप्तेश्वर आश्रमशाळा (कुरकुंभ), नवीन माध्यमिक विद्यालय (मळद), मनोरमा इंग्लिश मिडियम स्कूल (केडगाव), श्री जयमल्हार विद्यालय (देलवडी), श्रीराम विद्यालय (पडवी), श्री मंगेश मेमोरियल स्कूल (लिंगाळी), मदरसा इमामदूल उलूम युसूफिया उर्दु स्कूल (दौंड), श्री सद्गुरू समर्थ हंबीरबाबा विद्यालय (टाकळी भीमा), अमोल विद्यालय (दौंड), नामदेवराव पासलकर विद्यालय (नानवीज), उस्मान अली शाब्दी उर्दू विद्यालय (दौंड), सुभाषअण्णा कुल विद्यालय (काळेवाडी), शिवराम कुदळे विद्यालय (बोरीएेंदी), पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यालय (मिरवडी), दत्तकला इंटरनॅशनल स्कूल (स्वामी चिंचोली), श्री सेंट तेरेसा विद्यालय (यवत), लर्न अॅण्ड प्ले स्कूल (दौंड), ज्ञानराज पब्लिक (दौंड), संस्कार स्कूल (दौंड).  

९५ ते ९९ टक्के शेकडा निकाल असलेल्या विद्यालये पुढीलप्रमाणे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय (दौंड)- ९९.४८, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या शाळा (दौंड)- ९९.३९, न्यू इंग्लिश स्कूल (खामगाव)- ९९.३६, भैरवनाथ विद्यालय (गिरीम) - ९८.७६, श्री सदगुरू विद्यालय (देऊळगाव गाडा)- ९८.६४, माटोबा विद्यालय (नाथाचीवाडी)- ९८.४३, विद्या विकास मंदीर (यवत)- ९८.१९, न्यू इंग्लिश स्कूल (पारगाव सालू मालू)- ९८.०७, श्रीमती रंभाबाई कटारिया विद्यालय (बोरीबेल)- ९८.०७, श्री नागेश्वर विद्यालय (पाटस)- ९७.९०, सरस्वती विद्यालय (रावणगाव)- ९७.६१, श्रीराम विद्यालय (स्वामी चिंचोली)- ९७.६१, आदर्श विद्यालय (कानगाव)- ९७.५०, आलेश्वर माध्यमिक विद्यालय (आलेगाव)- ९७.५०, सुभाषअण्णा कुल विद्यालय (वाटलूज)- ९७.२९, शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय (दौंड)- ९७.२२, आदर्श विद्यालय (वडगाव बांडे)- ९७.०७, मनोरमा मेमोरियल गर्ल्स हायस्कूल (केडगाव)- ९६.८७, श्री सिध्देश्वर विद्यालय (पिंपळगाव)- ९६.८७, भाऊसाहेब भागवत विद्यालय (माळवाडी)- ९६.८२, श्री फिरंगाईमाता विद्यालय (कुरकुंभ)- ९६.५९, श्री भैरवनाथ विद्यालय (खडकी)- ९६.५१, गुरूदेव दादोजी कोंडदेव विद्यालय (मलठण)- ९६.३४, न्यू इंग्लिश स्कूल (नानगाव)- ९५.८९, मेरी मेमोरियल स्कूल (गिरीम)- ९५.७८, लक्ष्मीदेवी अग्रवाल विद्यालय (दौंड)- ९५.६५, श्री हनुमान विद्यालय (देवकरवाडी)- ९५.६५, सिध्देश्वर विद्यालय (देऊळगाव राजे)- ९५.१९.  

९० ते ९४ टक्के शेकडा निकाल असलेल्या विद्यालये : सुभाषअण्णा कुल विद्यालय (बोरीभडक)- ९४.७३, नवभारत विद्यालय (वाळकी) - ९४.७३, लाजवंती गॅरेला विद्यालय (दौंड)- ९३.९३, श्री गुरूकृपा विद्यालय (वासुंदे)- ९३.७५, एम. व्ही. भागवत विद्यालय (पाटस)- ९२.८५, जवाहरलाल विद्यालय (केडगाव)- ९२.४१, श्री गोपीनाथ विद्या मंदीर (वरवंड)- ९२.३५,  स्वामी विवेकानंद विद्यालय (आंबेगाव पुनर्वसन)- ९२.१५, भैरवनाथ विद्यालय (खुटबाव)- ९१.३७, श्री रोकडोबानाथ विद्यालय (भांडगाव)- ९०.५४, नाथनगर विद्यालय (बोरीपार्धी)- ९०.५२,  

८९ ते ७९ शेकडा निकाल असलेल्या विद्यालये : कैलास विद्या मंदीर (राहू)- ८९.६३, शहीद सोनू वर्पे विद्यालय (कोरेगाव भिवर)- ८५.७१, काकासाहेब थोरात विद्यालय (धायगुडेवाडी)- ८५.७१, शारदा विद्यालय (सहजपूर)- ७९.३१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT