गुन्हा  esakal
पुणे

Crime News : जमीन खरेदी व्यवहारात १७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः ग्राहकाला सुलभ हप्त्यावर जमीन खरेदी करण्याचे आमिष दाखवून त्याची तब्बल १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित लक्ष्मण शेंडगे (वय ३०, रा. माळवाडी, हडपसर), वैभव पांडुरंग तावरे (वय ३३ , रा. वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुनीर नसीर सय्यद (वय ४१, रा. सुशील सिद्धी इमारत, केशवनगर, मुंढवा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेंडगे व तावरे यांची श्री बालाजी डेव्हलपर्स नावाची जमीन खरेदी विक्रीची संस्था आहे. त्यांनी पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर आठ लाख रुपयात ११ गुंठे, २५ लाखात ४० गुंठे जमीन खरेदी करा, फार्म हाऊस फ्री मिळवा, अशी जाहिरात समाजमाध्यमात केली होती. त्यासाठी सुलभ हप्त्याची सोय व खरेदीखताचा खर्च नाही, असेही आमिष दाखविले होते.

फिर्यादी सय्यद हे संबंधित जाहिरात वाचून मगरपट्टा परिसरातील बालाजी डेव्हलपर्सच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी शेंडगे व तावरेची भेट घेतली. त्यांनी फिर्यादीस मुर्टी गावात जमीन विक्री सुरू असल्याचे सांगितले. त्यावर सय्यद यांनी २२ गुंठे जमीन खरेदी करण्याचे त्यांच्यासमवेत चर्चा करून निश्‍चित केले. विसार पावती, तसेच खरेदी व्यवहारातील पहिल्या टप्प्यात सय्यद यांनी बालाजी डेव्हलपर्सच्या बॅंक खात्यात १७ लाख रुपये जमा केले. जुलै २०२२ मध्ये त्यांनी पैसे जमा केले. त्यानंतर आतापर्यंत सय्यद यांचे खरेदीखत करण्यात आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT