A. R. Rahman 
पुणे

A. R. Rahman चा शो पुणे पोलिसांनी थांबवला! स्टेजवर जाऊन रहमानला सुनावलं!

Sandip Kapde

प्रसिद्ध संगितकार ए आर रहमानचा काल पुण्यात शो होता. हा शो पुणे पोलिसांनी थांबवला. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. थेट मंचावर जाऊन पोलिसांनी रहमानला सुनावलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

काल ए आर रहमानचा शो ८ वाजता सुरू झाला होता. १० वाजेपर्यतं हा शो संपवायला पाहीजे होता. मात्र तरी देखील शो सुरू होता. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जंप करुन थेट स्टेजवर गेले. यावेळी त्यांनी शो थांबवायला सांगितला. शो थांबवा नाहीतर गुन्हा दाखल करु, असे सांगितले. यानंतर ए आर रहमान स्टेजच्या खाली उतरून निघून गेले.

नेमकं काय घडलं?

ए आर रहमानच्या शो दरम्यान पोलीस देखील उपस्थित होते. १० नंतर देखील शो सुरू आहे. हे पाहून पोलिसांनी कारवाई केली. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकां स्टेजवर गेले. ए आर रहमानसमोर जाणून त्यांनी घड्याळाकडे हात दाखवत वेळ काय झाली हे सांगितलं. तरी देखील शो सुरू होता.

त्यामुळे पोलीस निरीक्षक एका बॅन्ड मेंबरकडे गेले आणि त्याला संतापून बंद करण्यास सांगितले. दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता असे म्हणत त्यांनी ए आर रहमानला सुनावले.

पोलिसांनी कारवाई केली तेव्हा ए आर रहमानचं लोकप्रिय गाणं छैय्या-छैय्या हे सुरु होतं. चाहते या गाण्याचा आनंद घेत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानं लगेच ए आर रहमाननं कॉन्सर्ट थांबवला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT