पुणे

बलमा अन् बादल ठरले आंधळीतील मैदानाचे मानकरी

CD

बलमा अन् बादल ठरले आंधळीतील मैदानाचे मानकरी

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायतराज अभियानांतर्गत शर्यती; ५०० पेक्षा जास्त बैलगाड्यांचा सहभाग

दहिवडी, ता. १ : आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायतराज अभियानांतर्गत एक आदत- एक बैल पद्धतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीला उदंड प्रतिसाद मिळाला. अतिशय रोमांचक ठरलेल्या या मैदानात भय्यासाहेब चोरमले (माळशिरस) यांचा बलमा आणि शौर्या दैवत गोयेकर (लोणंद) यांचा बादल ही जोडी विजेतेपदाची मानकरी ठरली.
या मैदानात ५०० पेक्षा जास्त बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. मुलाणी बंधू (पांगरी) यांचा ‘बादल’ व तात्या पैलवान सूळ (मोरोची) यांचा ‘बादल’ ही बैलगाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तृतीय क्रमांक विजय जवळकर मोरूची यांचा ‘बावऱ्या’ व झंजेवाडीकरांचा ‘देवा’ या बैलगाडीला मिळाला. चतुर्थ क्रमांकावर वैभव सोनवलकर तिरकवाडी यांचा ‘बच्चा’ व धनाजी पवार धुमाळवाडी यांचा ‘शिवा’ ही बैलगाडी राहिली. वसंत बापू यादव वडी यांचा ‘बादल’ व कळंबीकरांचा ‘तेजा’ या बैलगाडीला पाचवा, सहाव्या व सातव्या क्रमांकावर श्रीशैल अमोल चव्हाण लोणी यांचा ‘रतन’ व पालवे साहेब यांचा ‘चैतन्य’ तर गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली यांचा ‘भानुशेठ’ व वेळोशी फलटणकर यांचा ‘वस्ताद’ यांना मिळाला. कार्तिक अजयशेठ जाधव कलेढोण या नावाने पळालेल्या ‘भुंगा’ व ‘शाहीर’ बैलगाडीला आठवा क्रमांक मिळाला. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व प्रत्येकी दोन ढाली देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य अर्जुन काळे, सरपंच दादासाहेब काळे, संतोष काळे, नीलेश दडस, अभिजित भोसले, शिवाजी काळे, सुधाकर काळे, सविता खरात, शरद ड्रायव्हर, बापूराव चव्हाण, पिंटू दडस, दादा दडस, पिंटूराज पवार, तानाजी काळे, बापूराव काळे, दौलत चिखले, विकास शेंबडे, अजित बोडरे, पैलवान हरिचंद्र पिंगळे, संजय काळे, मच्छिंद्र काळे, नागेश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, तात्या नामदास, शहाजी नामदास, रोहित नामदास, प्रकाश चव्हाण, ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
............
छायाचित्र
7328
आंधळी (ता. माण) : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित बैलगाडी शर्यतीच्या विजेत्यांना बक्षीस देताना दादासाहेब काळे व मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT