पुणे

शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यार्थ्यांचे यश

CD

शिष्यवृत्ती परीक्षेत अभंग स्कूलचे यश

पिंपरी : शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता चौथी व सातवीच्या गुणवत्ता यादीत अभंग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इयत्ता चौथीतील वेदांत लक्ष्मण निंबाळकर आणि सातवीतील अथर्व प्रशांत माने यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन व प्राचार्या डॉ. कविता अय्यर आणि प्रा. विकास कंद यांनी कौतुक केले.

प्रीत पाटील राज्यात चौदावा
पिंपरी : सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थी प्रीत पाटील याने राज्यात चौदावा क्रमांक मिळविला. त्याने २९८ पैकी २७६ गुण मिळवत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत (शहरी) सातवे स्थान पटकावले. तसेच जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम गटात त्याने प्रथम क्रमांक मिळविला. शालेय समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, मुख्याध्यापिका दर्शना कोरके, विभागप्रमुख देवेंद्र मोतेसरदार, शिक्षक व पालकांनी प्रीत पाटीलचे अभिनंदन केले.

मॉडर्न स्कूलचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत
पिंपरी ः प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर-निगडी येथील सातवीचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, शाळेतील एकूण २८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. गुणवत्ता यादीत शांभवी देसाई (२४८ गुण), सिद्धी कणसे (२३२ गुण) आणि अभिलाषा काकडे (२२८ गुण) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना जयश्री चव्हाण, शिवाजी अंबिके, प्रशांत कुलकर्णी, श्रीकृष्ण निकम, अमोल नवलपुरे, अमृता गायकवाड आणि मनीषा बोत्रे यांनी मार्गदर्शन केले.

स्वामी समर्थ विद्यामंदिराचे यश
पिंपरी : श्री टागोर शिक्षण सोसायटी संचालित श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी तनुजा अमोल कोळी हिने २४८ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. श्रेयस राजाभाऊ तांबे याने २२४ गुण, तर प्रांजली मनोज हाके हिने २२० गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका एम. व्ही भैरवकर, शिक्षक एच.एम. चौधरी, आर. बी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

सरस्वती विद्यालय
पिंपरी : इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती विद्यालयाच्या दीपल दिनेश पाटील हिने पुणे जिल्हा शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत १७७ वा क्रमांक मिळविला. तिच्या यशाबद्दल संस्थापक डॉ. गोविंदराव दाभाडे, प्राचार्य संजय कांबळे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT