पुणे

ढेबेवाडी भाजप निवडीबद्दल अभिजीत पाटील यांचा सत्कार

CD

भाजपच्या जिल्हा चिटणीसपदी
अभिजित पाटील यांची निवड

ढेबेवाडी, ता. २२ : भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा चिटणीसपदी मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील अभिजित हिंदुराव पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा येथे सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून अभिजित पाटील पाटण तालुक्यात सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या वर्षभरात त्यांनी भाजपमध्ये पक्षसंघटनेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी त्यांची या पदावर निवड केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, राज्य परिषदेचे सदस्य सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, ‘‘पाटण तालुक्यात पक्ष संघटनेत काम करत असताना पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि जबाबदारीला तडा जाऊ न देता पक्षसंघटन मजबुतीसाठी काम करत राहणार आहे.’’
------------------------
08257
अभिजित पाटील
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT