पुणे

विकासकामांना प्राधान्य देणार : आमदार अभिजीत पाटील; भाळवणीत कार्यकर्ता संवाद बैठक

CD

UPR26B07506
भाळवणी ः कार्यकर्ता बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना आमदार अभिजित पाटील. समोर उपस्थित कार्यकर्ते.

निवडणुकीत जनतेसाठी लढणे महत्त्वाचे ः आमदार पाटील
भाळवणी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांचा केला सन्मान

पंढरपूर, ता. २१ : निवडणुकीतील विजया महत्त्वाचा आहे तसे जनतेच्या सेवेसाठी लढणे हे देखील अधिक महत्त्वाचे आहे. लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली आहे, असे मत आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

भाळवणी (ता.पंढरपूर) येथे कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलत होते. भाळवणी पंचायत समिती गणातून संभाजी शिंदे यांचा पराभव झाला असला, तरी जिल्हा परिषद व पळशी पंचायत समितीतील दोन्ही उमेदवारांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे.
निवडणुकीदरम्यान मतभेद होत असतात‌. आता निवडणुका संपल्या आहेत. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. भाळवणी गटाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, असे आश्वासन ही आमदार पाटील यांनी दिले.
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले, निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी येथील जनतेने मला मतांच्या रूपाने प्रचंड प्रेम दिले आहे. मी रडणारा नाही, तर लढणारा शिवसैनिक आहे. भविष्यात आमदार अभिजित पाटील यांच्या सहकार्याने कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विकासाला प्राधान्य देत, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने काम करत राहीन‌.
बैठकीत नूतन जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया गायकवाड व पंचायत समिती सदस्य अक्काताई लोखंडे यांचा आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दीपक पवार, भीमराव जाधव, दत्तात्रय नागणे, हरिभाऊ खरात, मोहन भोसले, श्रीकांत देशमुख, राजेंद्र कुचेकर, रामभाऊ ढोबळे, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे, साहेबराव नागणे, विलास देठे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घाडगे, बडू घोडके, माळशिरस तालुका प्रमुख मारुती आबुरे, प्रकाश देठे, माऊली केसकर, रणजित बागल, अतुल चव्हाण, नागनाथ खरात, हरिभाऊ लिंगे, प्रवीण शिंदे, महेश इंगोले उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच नितीन शिंदे यांनी तर आभार आनंद देशपांडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT