Pune Accident sakal
पुणे

Pune Accident : पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ विचित्र अपघात ; स्विफ्ट कार मधील तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा (तालुका आंबेगाव) येथे आज सकाळीस्विफ्ट कार, टेम्पो व कंटेनर च्या विचित्र आपघातात,मृत तरूनखेड तालुक्यातील राक्षेवाडी परिसरात असल्याची माहिती.

सकाळ वृत्तसेवा

मंचर : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा (तालुका आंबेगाव) येथे आज सकाळीस्विफ्ट कार, टेम्पो व कंटेनर च्या विचित्र आपघातात .स्विफ्ट कार जागीच जळून झाली खाक. स्विफ्ट मधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहेसुदैवाने स्विफ्ट करचा चालक व टेम्पोच्या चालक बचावला आहे. मृत तीन तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथीलअसल्याची माहिती प्राप्त होत आहे. या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मंचर पासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (GJ 01 WB 1737) बंद अवस्थेत उभा होता. त्याच ठिकाणी आज सकाळी टेम्पो (MH 12 QG 3351) व स्विफ्ट कार (MH 14 DT 0295) यांच्यात जोरदार धडक झाली. धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनर ला धडकला तर स्विफ्ट गाडीने पेट घेतला. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.

या अपघातात स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक बचावले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही. मंचरचीपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले, नंदकुमार आढारीयंत्रणा याबाबत कसून चौकशी करत आहेत.

-डी .के.वळसे पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT