Accident Pune-Solapur Highway Wife dead husband injured case registered against driver Loni Kalbhor police station sakal
पुणे

Accident News : पुणे- सोलापूर महामार्गावर अपघात; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

वाहनचालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरधाव वाहनाने दुचाकीवरील दांपत्यास धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथे घडली.

छाया सुहास जाधव (वय ३४) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सुहास शरद जाधव (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छाया यांची बहीण रेणुका नामदेव साळुंखे (वय ३२, रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वाहनचालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास आणि त्यांची पत्नी छाया हे दोघे पुणे-सोलापूर दुचाकीवरून होते. भरधाव वाहनाने सोरतापवाडी परिसरातील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे दुचाकीस्वार शरद आणि त्यांची पत्नी छाया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच छाया यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT