देऊळगाव राजे, ता. १३ : आलेगाव (ता. दौंड) येथील वीटभट्टीजवळ भरधाव येणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट मोटारीने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटार चालकाविरोधात दौंड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आदित्य बाळू शिंदे (वय २२, रा. भीमनगर, दौंड) हा तरुण आपली हिरो पॅशन प्रो मोटारसायकलवरून (क्र. एमएच ४२ एजे ६५६१) आलेगाव येथून दौंडकडे येत होता. आलेगाव फाट्याजवळील वीटभट्टीसमोर दौंडवरून सिद्धटेककडे जाणारी मारुती सुझुकी स्विफ्ट मोटारीवरील (क्र. एमएच १६ डीएस ८०१३) अज्ञात चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून आदित्य याच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात आदित्य याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातानंतर मोटारचालकाने अपघाताची माहिती न देता व जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. फरार मोटार चालकाचा शोध पोलिस घेत आहे.
या घटनेनंतर मृत तरुणाचे वडील बाळू शिवराम शिंदे यांनी दौंड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार नवनाथ भागवत हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.