Accident Sakal
पुणे

Accident : टँकरच्या धडकेने जुळ्या बहिणींचा मृत्यू; मुलींची आई गंभीर जखमी

टँकरने दुचाकीला धडक दिल्यामुळे जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. तर मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे.

प्रशांत पाटील

पुणे/विश्रांतवाडी - टँकरने दुचाकीला धडक दिल्यामुळे जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. तर मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना विश्रांतवाडीच्या मुख्य चौकात सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि श्रध्दा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्षे, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे मृत्यमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. तर या अपघातात मुलींची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८) गंभीर जखमी झाली आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा टॅंकर हा विद्यानगर (टिंगरेनगर) मार्गे विमानतळाकडून भोसरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी सतीशकुमार हरिनारायण झा (वय ४०) हे दुचाकीवरून त्यांच्या दोन मुली आणि पत्नीसह भोसरीकडे जात होते. ते विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात सिग्नलला थांबले होते.

सिग्नल सुरू झाल्यावर झा दुचाकीवरून पुढे जात असताना टॅंकरने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडले. या वेळी दोन्ही मुलींच्या डोक्यावरून टॅंकरचे चाक गेले. पोलिसांनी जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु दोन्ही मुलींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

किरण गंभीर जखमी झाल्या असून, सतीशकुमार किरकोळ जखमी झाले. सतीशकुमार हे नोकरीस आहेत. टॅंकरचालक प्रमोद कुमार यादव (रा. मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

येरवडा वाहतूक विभागाच्या हद्दीत १५ दिवसांत दुसरा अपघात झाला आहे. विश्रांतवाडी येथे अपघातात दोन मुली आणि महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी वाहतुकीची वर्दळ असते. अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक नियमनाकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT