accused of burglary in Baner area arrested police action Sakal
पुणे

Pune Crime News : बाणेर परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक

बाणेर रस्त्यावरील सकाळनगर भागात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे

सकाळ वृत्तसेवा

Pune News : बाणेर रस्त्यावरील सकाळनगर भागात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महम्मद रईस अब्दुल आहद शेख (वय ३७, रा. मालवणी, मुंबई) आणि महम्मद रिझवान हनीफ शेख (वय ३३, रा जोगेश्वरी पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील सकाळनगर भागात २३ फेब्रुवारी रोजी भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले होते.

त्यानुसार चतु:शृंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच, तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला. त्यात चोरटे मुंबई परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नालासोपारा, पालघर आणि जोगेश्वरी येथून आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मुंबईतून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा २० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT