patas sakal
पुणे

एसटी प्रवाशांकडुन १ कोटी लुटणारे आरोपी गजाआड

पुणे सोलापुर महामार्गावर पाटस (ता.दौंड) येथे पोलिस वेशात येवुन एसटीतील चार प्रवाशांकड़ुन १ कोटी १२ लाख रुपये लुटणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश करण्यात पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाला मोठे यश आले.

अमर परदेशी

पाटस : पुणे सोलापुर महामार्गावर पाटस (ता.दौंड) येथे पोलिस वेशात येवुन एसटीतील चार प्रवाशांकड़ुन १ कोटी १२ लाख रुपये लुटणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश करण्यात पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाला मोठे यश आले. या प्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात आले. रामदास भाऊसाहेब भोसले तुषार बबन तांबे, भरत शहाजी बांगर (तिघेही राहणार शिरुर जिल्हा पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. PUNE News)

सोलापुर येथुन तेलंग- भिवंडी या एसटीमधुन हितेंद्र जाधव,तेजस बोबडे,विकास बोबडे,संतोष बोबडे (चौघेही रा. वाघोशी) हे प्रवाशी तब्बल १ कोटी १२ लाख रुपये घेवुन प्रवास करीत होते.पुणे सोलापुर महामार्गावर पाटस हद्दीत मंगळवारी मध्यरात्री पोलिसांच्या वेशात आलेल्या चौघांनी बस थांबविली.एसटीत शिरुन संबधीत प्रवाशांना मारहाण, दमबाजी करीत खाली उतरविले.प्रवाशांकडील पैशाच्या बॅगा घेवुन मोठया शिताफिने पोबारा केला. हे बनावट पोलिस असल्याचा प्रकार लक्षात येताच संबधीत चारही प्रवाशांनी यवत पोलिस ठाण्यात घाव घेवुन झालेल्या प्रकार सांगितला.

त्यानंतर स्थानिक पोलिस अधिकारी व पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा गंभीर असल्याने पुणे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहीते,पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी पुणे स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्याकडे तपासाची सुत्रे दिली.त्यांनी स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक करुन तपासकामी रवाना केले. यावेळी तांत्रीक विश्लेषणावरुन बातमीदारामार्फत गोपनीय माहीती मिळाली.

रामदास भोसले हा आरोपी साथिदारांसह पळुन जाण्याच्या मार्गावर आहे.त्यानंतर पोलिसांनी संबधीत ठिकाणी सापळा रचुन त्यांना अटक केली. यावेळी कसुन तपास केला असता. आरोपींकडुन चोरलेल्या मालापैकी ९१ लाख ८४ हजार ५४० रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली कार,बुलेट,ज्युपीटर दुचाकी, दोन मोबाइल फोन ही जप्त करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT