construction.jpg
construction.jpg 
पुणे

लाॅकडाउनमुळे मराठी बांधकाम मजुरांना आले 'अच्छे दिन'

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : लॉकडाउनमध्ये अनेक ठिकाणांची बांधकामे बंद असल्याने परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी निघून गेले आहेत. शासनाने निर्बंध उठवल्यानंतर इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने आता मराठी बांधकाम मजुरांना 'अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. लॉकडाउनच्या अगोदर मिळणारी रोजंदारी आणि आता मिळणारी रोजंदारी यामध्ये तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.
 

पावसाळा तोंडावर आल्याने बांधकाम व्यवसायिकांनी वेगाने कामांना सुरुवात केली आहे. पाऊस सुरू झाल्यास पुन्हा कामांमध्ये अडथळा येईल म्हणून बांधकाम व्यवसायिक तातडीच्या कामांना प्राधान्य देत आहेत. त्यातच परप्रांतीय मजूर निघून गेल्याने मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असणाऱ्या 'मराठी' बांधकाम मजुरांना बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिव्यक्ती दोनशे ते तीनशे रुपये वाढवून रोजंदारी दिली जात आहे. रोजंदारीमध्ये वाढ झाल्याने मजुरांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
 

"वीस मजुरांच्या समूहाला स्लॅब भरण्यासाठी अगोदर 16 ते 18 हजार रुपये दिले जात होते. तेवढ्याच मजुरांच्या समूहाला आता 22 ते 25 हजार रुपये द्यावे लागत आहेत. मजूर मिळत नसल्याने वाढीव दर दिल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. घेतलेली कामं पूर्ण करून देणं आवश्यक आहे", असे कोल्हेवाडी, किरकटवाडी येथे एका बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करणारे ठेकेदार संजय मोकर यांनी सांगितले.
     

"बांधकाम व्यवसाय अगोदरच मंदीच्या संकटात अडकलेला असताना आता पुढील काळात बांधकामासाठी मजूर मिळणं कठीण असणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायासमोर हे एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे. परंतु मराठी कामगारांना बांधकाम व्यवसायामध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे," असे बांधकाम व्यावसायिक सुभाष कोल्हे यांनी सांगितले. लॉकडाउननंतर बांधकाम व्यवसायासह इतरही क्षेत्रांमध्ये मराठी कारागीर व इतर मजुरांना संधी निर्माण झाली आहे; ही संधी 'मराठी माणूस' कसा स्विकारतोय हे येणारा काळंच ठरवणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT