शिकागोत अडकलेले आजोबा पुण्यात परतले पण...

plasma-therapy1.jpg
plasma-therapy1.jpg

पुणे : शिकागोत राहणाऱ्या एकुलत्या एक लेकीकडं गेलेल्या 70 वर्षांच्या आजोबांचा मुक्काम वाढला तो लॉकडाउनमुळं. तो पुन्हा वाढेल, या भीतीनं ते पुण्यात परतले. मात्र, त्यांचा इथला मुक्काम हॉटेलमध्येच (क्वॉरंटाइन) राहिला. त्यात त्यांना कोरोना झाला. पुण्यात एकही नातेवाईक नसल्यानं आजोबांची काळजी कोण घेणार?, अशा अडचणी समोर आल्या. शेवटी महापालिकेतील अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आणि कर्मचाऱ्यांना आजोबांना खासगी रुग्णालयात दाखल तर केलंच; तसंच ते ठणठणीत होण्यासाठी देखभालही घेत आहेत. आता दोन दिवसांत आजोबांना घरीही सोडले जाणार आहे. 

परदेशातून आलेल्या 628 पुणेकरांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन केले होते. त्यापैकी 428 जणांना घरी सोडले. उर्वरित प्रवाशांमध्ये शिकागोतून आणलेले आजोबाही आहेत. त्याची मुलगी-जावई आणि नातवंडं सगळीजण शिकागोत राहतात. मात्र, ते एकटेच पुण्यात राहतात. सुटीनिमित्त ते नातवंडांना भेटण्यासाठी शिकागोला गेले आणि लॉकडाउनमुळे तिथेच अडकले. लॉकडाउनमध्ये शिथिलता जाहीर होताच, आजोबांनी पुणे गाठले. तेव्हा एका हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली.

अन्य प्रवाशांप्रमाणे आजोबांचा "स्वॅब' घेतला अन तपासणीत ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. या प्रवाशांच्या क्वॉरंटाइनची जबाबदारी असलेल्या युवराज देशमुख यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी आजोबांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. मात्र, पुण्यात कोणीही नातेवाईक नसल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे सरकारी दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेऊन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजोबांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्याचप्रमाणे त्यांच्या औषधांसह जेवणाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली. त्यांना मानसिक आधारही दिला. आजोबा आता ठणठणीत होत असून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परदेशातून आलेल्या प्रत्येकाची काळजी घेतली जात आहे. विमानतळापासून हॉटेलमध्ये पोचण्यासाठी त्यांना सुविधा दिल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. हॉस्पिटलमधील आजोबांवर उपचार सुरू असून आता ते बरे आहेत. 
- युवराज देशमुख, 
अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com