lockdown
lockdown 
पुणे

आंबेगावातील प्रतिबंधित क्षेत्रात फिरणाऱ्यांना दणका

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील शिनोली व पिंगळवाडी या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिक इतरत्र विनाकारण फिरणाऱ्यांवर घोडेगाव पोलीसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे.

पिंगळवाडी येथील शंकर श्रीपती खुटाण यांना कुटुंबासह होम क्वारंटाइन केले असतांनाही ते विनाकारण फिरत होते. तसेच, शिनोली येथील राजू इनामदार व जिगर बोऱ्हाडे हे शिनोली गावच्या हद्दीत विनाकारण फिरताना दिसले. या तिघांच्या विरोधात घोडेगाव पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन व संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

शिनोली येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने प्रशासनाने हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तरीही जिगर बोऱहाडे ही व्यक्ति विनाकारण एसटी बसस्थानक परिसरात फिरत असल्याने त्याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, शिनोली येथील राजू इनामदार यांच्यावरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंगळवाडी येथील मच्छिंद्र खुटाण हा पत्नी व दोन मुलांसह मुंबई (घाटकोपर) येथून पिंगळवाडी येथे 18 मे रोजी आला होता. या सर्व कुटुंबाला 14 दिवस होम क्वारंटाइन करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही कुटुंबातील शंकर श्रीपती खुटाण हे विनाकारण आपल्या दुचाकी गाडीवरुन पिंगळवाडी, घोडेगाव, मंचर या परिसरात फिरुन आले. घोडेगाव पोलिसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने संस्थात्मक क्वारंटाइन करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT