Police esakal
पुणे

Pune Crime : १०० सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षभरात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) १०० सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षभरात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) १०० सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. सराईत गुन्हेगार राजू हनुमंत गायकवाड (वय ३९, रा. गंगानगर, हडपसर) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये बुधवारी (ता. ३१) शंभरावी कारवाई करण्यात आली.

राजू गायकवाड याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. गायकवाड सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. हडपसर येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे प्रतिबंध शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, उपनिरीक्षक राजू बहिरट, शेखर कोळी, सहायक उपनिरीक्षक दिलीप झानपुरे, योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यांनी आतापर्यंत शहरातील ११५ गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT